1 / 8आले-लिंबाचा रस हे एक पारंपरिक, नैसर्गिक व आरोग्यदायी पेय आहे. आणि अनेक घरांमध्ये तो आरोग्यासाठी नियमितपणे वापरला जातो. या दोन्ही घटकांमध्ये असंख्य पोषणमूल्ये आणि औषधी गुणधर्म असतात. 2 / 8त्यामध्ये जिंजरॉल नावाचे सक्रिय संयुग असते. ते शरीरातील सूज कमी करण्याचे, वेदना कमी करण्याचे आणि पचन सुधारण्याचे कार्य करते. लिंबामध्ये भरपूर प्रमाणात जीवनसत्त्व 'सी' असते. जे रोगप्रतिकारक शक्ती वाढवते आणि त्वचेसाठी उपयुक्त ठरते. हे दोन घटक एकत्र आल्यावर त्यांचा परिणाम शरीरावर आणखी प्रभावी होतो.3 / 8आले-लिंबाचा रस सकाळी उपाशीपोटी घेतल्यास तो शरीरातील टॉक्सिन्स काढून टाकण्यास मदत करतो. शरीराचे मेटाबॉलिझम सुधारते. जे वजन कमी करण्यासाठी फायदेशीर ठरते. या पेयामुळे पचन क्रिया सुधारते. अपचन, गॅस अशा त्रासांपासून आराम मिळतो. तसेच, आल्यामुळे मळमळ, उलटी किंवा प्रवासात होणारी बेचैनीही कमी होते.4 / 8थंडीत आले-लिंबाचा गरम रस घेतल्यास सर्दी, खोकला आणि घशातील खवखव कमी होते. लिंबातील अँण्टीऑक्सिडंट्स आणि आल्यातील अँण्टीबॅक्टेरियल गुणधर्म एकत्र येऊन रोगप्रतिकारक शक्ती वाढवतात. 5 / 8शरीर हायड्रेटेट ठेवण्यासाठी हा आले-लिंबाचा रस फायद्याचा असतो. त्यामुळे चमचाभर पाणी दिवसातून काही वेळा पिणे नक्कीच फायद्याचे ठरते. ज्यांची शरीरातील पाण्याची पातळी सारखी घटते अशांनी नक्कीच हा रस प्यावा. 6 / 8अनेक स्त्रिया मासिक पाळीच्या वेळी होणाऱ्या पोटदुखी किंवा अंगदुखीवर आराम मिळवण्यासाठीही विविध औषधे घेतात. हा रस घेतल्याने आराम नक्कीच मिळेल.7 / 8आले-लिंबाचा रस विशेषतः सकाळी उपाशीपोटी घेतल्यास सर्वोत्तम परिणाम मिळतात. व्यायामानंतर किंवा दिवसाच्या कोणत्याही वेळी, जेव्हा थकवा जाणवतो किंवा पचनास त्रास होत असेल, तेव्हा देखील तो फायदेशीर ठरतो. 8 / 8आले-लिंबाचा रस हा एक साधा पण नैसर्गिक आणि प्रभावी उपाय आहे. जो नियमितपणे घेतल्यास शरीर, मन आणि त्वचेसाठी उपयुक्त ठरतो. मात्र, काही लोकांना आल्यामुळे आम्लपित्त होऊ शकते, त्यामुळे अशा परिस्थितीत डॉक्टरांचा सल्ला घेणे योग्य ठरेल.