1 / 8वजन आणि शुगर या दोन्ही गोष्टी नियंत्रित ठेवायच्या असतील तर मधुमेह असणाऱ्या व्यक्तींनी जेवणाची सुरुवात कशी करावी, कोणते पदार्थ खावे तसेच कोणते पदार्थ टाळावे, याविषयीची माहिती डॉ. जगन्नाथ दीक्षित यांनी साेशल मीडिया पेजवर शेअर केली आहे. 2 / 8यामध्ये ते सांगतात की जे लोक प्री- डायबिटिक स्टेजमध्ये आहेत, त्यांनीही त्यांची शुगर वाढू नये यासाठी याच काही नियमांचे पालन करावे.3 / 8डॉ. दीक्षित यांच्यामते ज्यांना शुगरचा त्रास आहे, अशा लोकांनी मनुका, बेदाणे अशा गोड चवीचा सुकामेवा खाणं टाळलं पाहिजे. बदाम, अक्रोड, शेंगदाणे असे ते खाऊ शकतात. 4 / 8कोणत्याही व्यक्तींनी जेवणाची सुरुवात सलाड खाऊन करणं गरजेचं आहे. पण जे लोक डायबिटीक आणि प्री- डायबिटीक अवस्थेत आहेत त्यांनी गाजर आणि बीट खाणे टाळायला हवे. काकडी, टोमॅटो किंवा इतर सलाड प्रकार ते खाऊ शकतात.5 / 8जेवणाची सुरुवात सलाड खाऊन झाल्यानंतर मोड आलेली कडधान्ये खावी. यामध्ये तुमची पचनक्षमता जशी आहे त्यानुसार कच्चे किंवा वाफवलेले, शिजवलेले कडधान्य साधारण १ वाटी एवढ्या प्रमाणात खावे. यानंतर मग जेवणाला सुरुवात करावी.6 / 8डॉ. दीक्षितांनी सांगितलेला आणखी एक महत्त्वाचा नियम म्हणजे जेवणाची सुरुवात कधीही पोळी किंवा चपाती, भाकरी खाऊन करू नये. 7 / 8ज्या लोकांची HBA1C पातळी खूप वाढलेली असते त्यांनी २ ते ३ महिने फळं खाणंही टाळायला हवं. ती लेव्हल एकदा नॉर्मलला आली की मग डॉक्टरांच्या सल्ल्याने ते काही फळ खाण्यास सुरुवात करू शकतात.8 / 8याशिवाय अधूनमधून काही खाण्याची सवय नको. कारण त्यामुळे शरीरातील इन्सुलिन वाढू शकते. शरीर हायड्रेटेड ठेवण्यासाठी पाणी, ग्रीन टी, ब्लॅक कॉफी असं काही घेऊ शकता. याशिवाय रिफाईंड शुगर खाणे टाळावे आणि दिवसातून ४५ मिनिटे व्यायाम करावा.