1 / 6मधुमेह असणाऱ्या व्यक्तींनी प्रत्येक पदार्थ खातानाच काळजी घ्यायला हवी. फळांच्या बाबतीतही तोच नियम. कारण काही फळांचा ग्लायसेमिक इंडेक्स खूप जास्त असतो. अशी फळं खाल्ल्याने मधुमेहींना त्रास होऊ शकतो (diabetic patients must avoid 5 types of fruits). ती फळं नेमकी कोणती ते पाहूया..(5 fruits diabetics should not eat)2 / 6डॉ. संदीप खरब यांनी टाईम्स ऑफ इंडियाला दिलेल्या माहितीनुसार केळीचा ग्लायसेमिक इंडेक्स हा ती केळी किती पिकलेली आहे यावर अवलंबून असतो. केळी जेवढी जास्त पिकलेली, तेवढा तिचा ग्लायसेमिक इंडेक्स जास्त. त्यामुळे डायबिटीस रुग्णांनी खूप पिकलेली केळी खाणं टाळावं.3 / 6उन्हाळ्यात टरबूज भरपूर प्रमाणात असतात. पण टरबुजाचा ग्लायसेमिक इंडेक्स ७२- ८० एवढा असल्याने डायबिटीस असणाऱ्यांनी कमी प्रमाणात टरबूज खावे.4 / 6अननसामध्ये नॅचरल शुगर जास्त प्रमाणात असते. त्यामुळे अननस खाल्ल्याने रक्तातील साखर लगेचच वाढू शकते. म्हणून अननस खाणं मधुमेहींनी टाळावं किंवा कमी प्रमाणात खावं.5 / 6डॉ. हिमिका चावला यांच्यामध्ये द्राक्षांचा जीआय कमी असतो. पण त्याचे आकारमान लहान असल्याने ते प्रमाणापेक्षा जास्त खाल्ले जातात आणि त्यातूनच मधुमेहींची साखर वाढण्याचा धोका असतो.6 / 6आंब्यामध्ये सुक्रोज आणि फ्रुक्टोज दोन्ही असतात. त्यामुळे मधुमेहींनी आंबा थोडा जपूनच खायला हवा. जेवण झाल्यावर लगेचच आंबा खाणं टाळावं.