By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2026 19:43 IST
1 / 7नारळपाणी तब्येतीसाठी वरदान मानलं जातं. कारण नारळपाणी प्यायल्याने शरीर हायड्रेट राहण्यासोबतच अनेक पोषक तत्वेही मिळतात. या पाण्याने लगेच एनर्जीही मिळते. अनेक हेल्थ एक्सपर्ट नियमितपणे नारळपाणी पिण्याचा सल्ला देतात. उन्हाळ्यात तर नारळपाणी भरपूर प्यायलं जातं. पण आपल्याला माहीत असावं की, प्रत्येक वयोगटासाठी नारळपाणी सुरक्षित नसतं. काही वयोगटातील लोकांसाठी नारळपाणी हे आरोग्यासंबंधी वेगवेगळ्या समस्या निर्माण करू शकतं. अशात जाणून घेऊया की, कोणत्या वयाच्या लोकांनी नारळपाणी टाळलं पाहिजे. 2 / 7नारळपाणी जरी आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतं. यात अजिबात दुमत नाही. पण काही लोकांसाठी नारळपाणी फायद्याऐवजी तोट्याचं ठरू शकतं. हेल्थ एक्सपर्ट सांगतात की, ६० पेक्षा अधिक वय असलेल्या लोकांमध्ये नारळपाण्याने वेगवेगळ्या समस्या होऊ शकतात. त्यामुळे ते पिताना वृद्धांनी काळजी घेतली पाहिजे. एक्सपर्ट सांगतात की, वाढत्या वयासोबत शरीराचं मेकॅनिजम स्लो होतं आणि आपल्या खाण्या-पिण्यावर प्रभाव टाकतं. खासकरून ६० वयानंतर लोकांमध्ये अवयव आधीच्या तुलनेत कमी सक्रिय होतात. त्यामुळे नारळपाणी प्यायल्यावर त्यातील तत्वांमुळे असंतुलन होऊ शकतं. 3 / 7नारळपाण्यात पोटॅशिअमचं प्रमाण भरपूर असतं. पण वृद्धांमध्ये पोटॅशिअम हे हायपरकलेमियाचं कारण ठरू शकतं. ही एक अशी स्थिती आहे, ज्यात रक्तात पोटॅशिअमचं प्रमाण जास्त होतं. वृद्धांमध्ये मेटाबॉलिज्म स्लो झाल्याने शरीर जास्तीचं पोटॅशिअम लवकर प्रोसेस करू शकत नाही. ज्यामुळे हृदयाचे ठोके अनियमित होतात आणि स्नायूंमध्ये अचानक कमजोर जाणवू लागते.4 / 7वाढत्या वयासोबतच किडनीची काम करण्याची क्षमता देखील कमी होते. ज्यामुळे शरीरातून जास्तीचे खनिज आणि टॉक्सिन्स बाहेर पडत नाहीत. अशात नारळपाणी किडनीच्या आरोग्यावर प्रभाव टाकतं. जर आधीच कुणाला किडनीसंबंधी समस्या असेल तर नारळपाण्याने त्यांच्या किडनीवर अतिरिक्त दबाव पडू शकतो. यामुळे शरीरात पोटॅशिअम आणि सोडिअमचं संतुलन बिघडतं. हा प्रकार जीवघेणा ठरू शकतो.5 / 7नारळपाणी ब्लड प्रेशरमध्ये महत्वाचं ठरतं. ते हाय ब्लड प्रेशर कमी करण्यास मदत करतं. पण लो ब्लड प्रेशरची औषधं घेत असलेल्या वृद्धांसाठी ते घातक ठरू शकतं. नारळपाणी प्यायल्याने बीपी आणखी जास्त कमी होतो. ज्यामुळे अचानक चक्कर येणे, जास्त कमजोरी, बेशुद्ध पडणे अशा समस्या होऊ शकतात. 6 / 7ज्या लोकांना डायबिटीस आहे त्यांनी सुद्धा नारळपाणी पिताना काळजी घ्यायला हवी. नारळ पाण्यात नॅचरल शुगर अशते आणि कार्बोहायड्रेट असतात. पण हे जास्त प्रमाणात प्यायल्याने ब्लड शुगर लेव्हल अचानक वाढू शकते. वृद्धांच्या शरीरात इन्सुलिनची संवेदनशीलता कमी असल्याने ते ग्लूकोजच्या जास्त प्रमाणाला चांगल्याप्रकारे कंट्रोल करू शकत नाही. 7 / 7नारळपाण्याचा वृद्धांच्या पचन तंत्रावर देखील प्रभाव पडतो. अनेक वृद्धांना नारळपाणी प्यायल्यानंतर गॅस, पोटदुखी किंवा जुलाब लागण्याची समस्या होते. नारळ पाण्यातील नॅचरल इलेक्ट्रोलाइट्स संवेदनशील पचन तंत्राला प्रभावित करतात. खासकरून उपाशीपोटी नारळपाणी प्याल तर पचनासंबंधी समस्या होऊ शकतात.