Join us

किचनमधील 'या' वस्तूंमुळे दुप्पट वाढतो कॅन्सरचा धोका; डॉक्टर म्हणाले, आताच उचला अन् बाहेर फेका

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2025 20:47 IST

1 / 9
कॅन्सरचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत आहेत, पण तुम्ही कधी विचार केला आहे का की, तुमच्या किचनमध्ये वापरल्या जाणाऱ्या वस्तूंमुळेही कॅन्सरचा धोका आणखी वाढतो.
2 / 9
कॅन्सर स्पेशालिस्ट आणि आस्था कॅन्सर संस्थेचे संचालक डॉ. तरंग कृष्ण यांनी एका पॉडकास्टमध्ये सांगितलं की किचनमधील काही वस्तू कॅन्सरचा धोका दुप्पट करत आहेत.
3 / 9
डॉ. तरंग कृष्ण यांनी दिलेल्या माहितीनुसार, किचनमधील एल्युमिनियमची भांडी उचलून फेकून द्या. या भांड्यांमध्ये टोमॅटो, लिंबू आणि चिंच यांसारखे आम्लयुक्त अन्नपदार्थ शिजवल्याने एल्युमिनियम विरघळू शकतं.
4 / 9
एल्युमिनियमचा जास्त वेळा सतत वापर केल्याने आपल्या शरीरावर वाईट परिणाम होऊ शकतो आणि गंभीर आजार होऊ शकतात.
5 / 9
टेफ्लॉन कोटिंग नॉन-स्टिक भांडी देखील वापरू नयेत, कारण त्यात मोठ्या आचेवर स्वयंपाक केल्याने हानिकारक गॅस बाहेर पडू शकतात. यामुळे टेफ्लॉन देखील खराब होतो, ज्यामुळे अनेक धोकादायक आजार होऊ शकतात.
6 / 9
डॉक्टर म्हणाले, जर तुम्ही स्टीलच्या काथ्याने नॉन-स्टिक भांडी धुतली तर केमिकल्स बाहेर येऊ लागतात. जेव्हा तुम्ही त्यात पुन्हा अन्न शिजवता तेव्हा तुम्ही विष तयार करत असता, जे अन्नात मिसळतं.
7 / 9
प्लास्टिकच्या भांड्यांमुळे कॅन्सरसारख्या गंभीर आजारांचा धोका देखील वाढतो, कारण मायक्रोवेव्हमध्ये गरम केल्यावर किंवा वापरल्यास त्यातून बीपीए सारखी धोकादायक केमिकल्स बाहेर पडू शकतात.
8 / 9
हे केमिकल्स तुमच्या हार्मोनल सिस्टमवर परिणाम करू शकतात आणि दीर्घकाळात आरोग्य समस्या निर्माण करू शकतात.
9 / 9
डॉ. तरंग कृष्णा यांनी शेवटी किचनमध्ये स्वयंपाक करण्यासाठी नेहमी पितळ आणि लोखंडाची भांडी वापरण्याचा मोलाचा सल्ला दिला आहे.
टॅग्स : आरोग्यहेल्थ टिप्सकर्करोग