डायबिटीस असणाऱ्या व्यक्तींनी किती आंबे, आमरस खाल्ला तर चालतो? एक्सपर्ट सांगतात योग्य प्रमाण

Updated:April 29, 2025 17:57 IST2025-04-29T17:00:29+5:302025-04-29T17:57:31+5:30

Is Mango Good for Diabetes Patient: मधुमेह असणाऱ्या व्यक्तींनी आंबा किंवा आमरस खाणं कितपत योग्य असू शकतं.

डायबिटीस असणाऱ्या व्यक्तींनी किती आंबे, आमरस खाल्ला तर चालतो? एक्सपर्ट सांगतात योग्य प्रमाण

आंब्याचा सिझन म्हणजे वर्षातून फक्त दिड ते दोन महिने. यातही मधुमेह असल्यामुळे अनेक जण आंबे खाणं टाळतात आणि मग अतिशय आवडीचं फळ मनमुराद पद्धतीने खाता आलं नाही म्हणून मनातून नाराजही होतात.(can diabetic patient eat mango and mango juice)

डायबिटीस असणाऱ्या व्यक्तींनी किती आंबे, आमरस खाल्ला तर चालतो? एक्सपर्ट सांगतात योग्य प्रमाण

म्हणूनच मधुमेह असणाऱ्या व्यक्तींनी आंबा किंवा आमरस खाणं कितपत योग्य असू शकतं, याविषयी आहारतज्ज्ञांनी दिलेली ही माहिती एकदा बघाच..(is it okay to eat mango or mango juice by diabetic patient?)

डायबिटीस असणाऱ्या व्यक्तींनी किती आंबे, आमरस खाल्ला तर चालतो? एक्सपर्ट सांगतात योग्य प्रमाण

आंबा, आमरस आणि मधुमेह याविषयी माहिती देताना आहारतज्ज्ञ मंजिरी कुलकर्णी असं सांगतात की मधुमेह असणाऱ्या व्यक्तींची साखर जर नियंत्रणात असेल तर त्यांनी एखादा लहान किंवा मध्यम आकाराचा आंबा संपूर्ण फळ म्हणून खाण्यास हरकत नाही.

डायबिटीस असणाऱ्या व्यक्तींनी किती आंबे, आमरस खाल्ला तर चालतो? एक्सपर्ट सांगतात योग्य प्रमाण

एवढंच नाही तर मधुमेह असणाऱ्या व्यक्तींना आमरस खाण्याची इच्छा होत असेल तर तो आस्वादही ते घेऊ शकतात.

डायबिटीस असणाऱ्या व्यक्तींनी किती आंबे, आमरस खाल्ला तर चालतो? एक्सपर्ट सांगतात योग्य प्रमाण

पण त्यासाठी रस करण्याची पद्धत मात्र थोडी बदलायला हवी. आमरस करताना तो मिक्सरमधून फिरवून अजिबात बारीक करू नये. यामुळे त्याच्यातले फायबर आणि इतर पौष्टिक घटक निघून जातात.

डायबिटीस असणाऱ्या व्यक्तींनी किती आंबे, आमरस खाल्ला तर चालतो? एक्सपर्ट सांगतात योग्य प्रमाण

तसेच आमरस केल्यानंतर त्यात दूध आणि साखर घालून खाणेही टाळावे. अशा पद्धतीने केलेला आमरस मधुमेह असणाऱ्या व्यक्तींनी आठवड्यातून खाल्ला तरी चालतो.

डायबिटीस असणाऱ्या व्यक्तींनी किती आंबे, आमरस खाल्ला तर चालतो? एक्सपर्ट सांगतात योग्य प्रमाण

पण आमरसाचा अतिरेक टाळा. तुमची तब्येत, वजन, शुगर, वय हे सगळं तपासून तुम्ही किती प्रमाणात आंबा आणि आमरस खावा, याविषयीचा सल्ला तुमच्या नेहमीच्या डॉक्टरांकडून घेणे अधिक चांगले.