लहान मुलांचं हिमोग्लोबिन कमी, खूप थकतात-चिडचिड करतात? ६ पदार्थ खाऊ घाला, वाढेल रक्त...
Updated:June 10, 2025 17:32 IST2025-06-10T17:17:28+5:302025-06-10T17:32:02+5:30
Iron Deficiency In Children Include 6 Vegetarian Foods In Diet : Vegetarian Foods That Are Loaded with Iron : Best Iron-Rich Foods for Kids to Prevent Deficiency : 6 proven Iron Rich Foods For Kids to prevent iron deficiency : शाकाहारी आहारातही असे अनेक पदार्थ आहेत जे लोहाचे उत्तम स्रोत आहेत.

लहान मुलांमध्ये आयर्नची कमतरता ही फारच कॉमन अशी समस्या आहे. यामुळे अशक्तपणा, थकवा, आणि रोगप्रतिकारशक्ती कमी होणे यांसारख्या समस्या निर्माण (Vegetarian Foods That Are Loaded with Iron) होऊ शकतात.
आयर्नची कमतरता विशेषतः लहान मुलांमध्ये आणि किशोरवयीन मुलींमध्ये ( Best Iron-Rich Foods for Kids to Prevent Deficiency) अधिक आढळते. लोहाच्या कमतरतेचा मुलांच्या शारीरिक विकासावर, शिकण्याच्या क्षमतेवर आणि वर्तनावर नकारात्मक परिणाम होतो. या समस्येवर प्राथमिक उपचार म्हणून मुलांना लोहयुक्त आहार देणे आवश्यक असते .
आहारात लोहयुक्त पदार्थांचा समावेश अत्यंत महत्त्वाचा आहे. शाकाहारी आहारातही असे अनेक पदार्थ आहेत जे लोहाचे उत्तम स्रोत आहेत आणि मुलांना ते सहजपणे देता येतात. यासाठी आपण मुलांच्या आहारात कोणकोणते शाकाहारी लोहयुक्त पदार्थ देऊ शकतो ते पाहूयात(6 proven Iron Rich Foods For Kids to prevent iron deficiency).
१. आयरन-फोर्टिफाइड सिरिअल्स व ओट्स :-
मुलांमधील लोहाची कमतरता भरुन काढायची असेल तर आयरन-फोर्टिफाइड सिरिअल्स आणि ओट्स हे सर्वात सोपे पर्याय आहेत. एक वाटी धान्य किंवा ओट्समध्ये साधारणपणे ३.५ मिलीग्राम लोह असते. ओट्स किंवा आयरन-फोर्टिफाइड सिरिअल्स खाताना आपण त्यात मुलांच्या आवडीची फळं घालूंन दिली तर ते अधिक जास्त टेस्टी लागेल.
२. डाळी आणि कडधान्ये :-
मसूर, चणे, राजमा, वाटाणा यांसारख्या डाळी आणि कडधान्यांमध्ये भरपूर प्रमाणात लोह असते. आपण मुलांना डाळ, सूप, उसळ किंवा दालखिचडीच्या स्वरूपात या डाळी व कडधान्ये खायला देऊ शकता.
३. हिरव्या पालेभाज्या :-
पालक, मेथी, ब्रोकोली यांसारख्या हिरव्या पालेभाज्यांमध्ये लोह मुबलक प्रमाणात असते. पालक पनीर, मेथी पराठा किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या पालेभाज्या तयार करून आपण मुलांच्या रोजच्या आहारात त्याचा समावेश करु शकता.
४. सुकामेवा आणि बिया :-
बदाम, काजू, अक्रोड, जर्दाळू, तीळ आणि भोपळ्याच्या बिया हे पदार्थ लोहाचे चांगले स्रोत आहेत. मुलांना स्नॅक म्हणून खायला देऊ शकता किंवा दूध आणि दह्यात मिक्स करुन खायला देऊ शकता. यामुळे मुलांमध्ये असणारी आयर्नची कमतरता भरुन निघेल.
५. फळे :-
फळांमध्ये देखील भरपूर प्रमाणांत लोह असते. डाळिंब, सफरचंद, खजूर आणि अंजीर या फळांमध्ये लोह असते. या फळांचा समावेश मुलांच्या रोजच्या आहारात करावा किंवा आपण मुलांना स्मूदी देखील तयार करून देऊ शकता.
६. तृणधान्ये :-
नाचणी, बाजरी, ज्वारी यांसारख्या तृणधान्यांमध्येही लोह असते. नाचणीची भाकरी, बाजरीची खिचडी किंवा ज्वारीचे धिरडे असे वेगवेगळे पदार्थ तयार करून आपण मुलांमधील लोहाची कमतरता भरुन काढू शकता.