फायदेच फायदे! साखर नसलेला चहा आरोग्यासाठी गुणकारी, वजन कमी करण्यासाठी प्रभावी
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 23, 2025 18:12 IST
1 / 7अनेकांच्या दिवसाची सुरुवात ही गरमागरम चहासोबत होते. काहींना गोड चहा आवडत असल्याने ते साखर घालतात. पण साखर आरोग्यासाठी घातक आहे. त्यामुळे ती टाळण्याचा सल्ला हा बऱ्याचदा दिला जातो. 2 / 7आरोग्य तज्ञांच्या मते, जर तुम्ही दररोज चहा पित असाल तर तो साखर नसलेला प्या किंवा कमी साखरेपासून बनवलेला प्या. साखर न घालता चहा पिण्याचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. 3 / 7जास्त साखरेच्या सेवनामुळे शरीरात शुगर लेव्हल वाढू शकते, जी दीर्घकाळ सेवन केल्यास मधुमेहाचा धोका वाढतो. साखर नसलेला चहा प्यायल्याने असं काही होत नाही. डायबेटिसच्या रुग्णांना असा चहा पिण्यास सांगितलं जातं. 4 / 7वजन कमी करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांनी साखर असलेला चहा टाळावा. वजन कमी करण्यासाठी साखर नसलेला चहा फायदेशीर ठरू शकतो. चहामध्ये अँटीऑक्सिडंट्स असतात जे मेटाबॉलिज्म वाढवतात, फॅट बर्न करण्यास मदत करतात.5 / 7रिसर्सनुसार, जास्त साखरेचे सेवन कोलेस्टेरॉल आणि ब्लड प्रेशर वाढवू शकतं, जे हृदयासाठी खूप हानिकारक आहेत. साखर नसलेला चहा प्यायल्याने हा धोका कमी होतो. चहामध्ये फ्लेव्होनॉइड्स असतात, जे रक्ताभिसरण सुधारतात आणि निरोगी हृदय राहतं..6 / 7चहामधील साखर दातामध्ये प्लाक आणि कॅविटी निर्माण करू शकते, परंतु साखर नसलेला चहा प्यायल्याने काहीही होत नाही.7 / 7चहामध्ये अँटीऑक्सिडंट्स असतात जे त्वचेला आतून डिटॉक्सिफाय करतात, ज्यामुळे त्वचा चमकदार होते आणि सुरकुत्या पडत नाहीत.