फक्त ४ लवंगा आणि १ ग्लास पाणी- तब्येतीच्या कित्येक तक्रारी गायब, वाचा लवंगाचं पाणी पिण्याचे ५ फायदे

Updated:February 24, 2026 14:54 IST2026-02-24T14:45:01+5:302026-02-24T14:54:05+5:30

फक्त ४ लवंगा आणि १ ग्लास पाणी- तब्येतीच्या कित्येक तक्रारी गायब, वाचा लवंगाचं पाणी पिण्याचे ५ फायदे

लवंगामध्ये असणाऱ्या युजेनॉल या घटकात खूप औषधी गुणधर्म असतात. त्यामुळे दररोज सकाळी रिकाम्या पोटी लवंगाचं पाणी पिणं खूप फायद्याचं ठरतं. त्यासाठी रात्री झोपण्यापुर्वी १ ग्लास पाण्यात ३ ते ४ लवंग भिजत घालायच्या आणि सकाळी रिकाम्यापोटी ते पाणी प्यायचं.

फक्त ४ लवंगा आणि १ ग्लास पाणी- तब्येतीच्या कित्येक तक्रारी गायब, वाचा लवंगाचं पाणी पिण्याचे ५ फायदे

लवंगाचं पाणी रोज प्यायल्याने पचनाच्या कित्येक तक्रारी कमी होतात. ज्या लोकांना नेहमीच ब्लोटिंग, गॅसेस, अपचन असा त्रास असतो त्या लोकांचा त्रास कमी होण्यासाठी लवंगाचं पाणी उपयुक्त ठरतं.

फक्त ४ लवंगा आणि १ ग्लास पाणी- तब्येतीच्या कित्येक तक्रारी गायब, वाचा लवंगाचं पाणी पिण्याचे ५ फायदे

इन्फ्लामेशन म्हणजेच अंगावर आलेली सूज कमी करण्यासाठीही लवंगाच्या पाण्याचा फायदा होतो. काही जणांचं अंग सुजलेलं दिसतं. ही सूज घालविण्यााठी काही दिवस नियमितपणे लवंगाचं पाणी पिऊन पाहा.

फक्त ४ लवंगा आणि १ ग्लास पाणी- तब्येतीच्या कित्येक तक्रारी गायब, वाचा लवंगाचं पाणी पिण्याचे ५ फायदे

लवंगाचं पाणी पेनकिलर म्हणूनही काम करतं. ज्या लोकांना नेहमीच सांधेदुखी, बॉडीपेन असा त्रास हाेत असतो, त्यांच्या वेदना कमी करण्यासाठी लवंगाच्या पाण्याचा चांगला उपयोग होतो.

फक्त ४ लवंगा आणि १ ग्लास पाणी- तब्येतीच्या कित्येक तक्रारी गायब, वाचा लवंगाचं पाणी पिण्याचे ५ फायदे

सर्दी, खोकला वारंवार होत असेल किंवा सतत आजारी पडत असाल तर लवंगाचं पाणी पिऊन पाहा. रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते.

फक्त ४ लवंगा आणि १ ग्लास पाणी- तब्येतीच्या कित्येक तक्रारी गायब, वाचा लवंगाचं पाणी पिण्याचे ५ फायदे

ब्लड शुगर लेव्हल नियंत्रित ठेवण्यासाठीही लवंगाचं पाणी पिणं खूप फायदेशीर ठरतं. त्यामुळे मधुमेहींनाही त्याचा फायदा होतो, अशी माहिती डॉक्टरांनी dr.smita_peachtreeclini या इंस्टाग्राम पेजवर शेअर केली आहे.