By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2026 17:00 IST
1 / 7सकाळी उठल्यानंतर तोंड न धुता पाणी पिणं ही आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर सवय मानली जाते. यामुळे शरीराला बरेच फायदे मिळतात. (Benefits Of Drinking Water After Waking Up without Washing Mouth)2 / 7रात्री झोपेत आपल्या तोंडात लाळ तयार होते. यात पाचक एन्जाईम्स असतात. पाणी प्यायल्यानं ही लाळ पोटात जाते आणि पचनक्रिया सुधारते.3 / 7शरीरातील विषारी पदार्थ बाहेर निघण्यास मदत होते. ज्यामुळे रक्त शुद्ध होते आणि शरीर नैसर्गिकरित्या डिटॉक्स होण्यास मदत होते.4 / 7ज्यांना बद्धकोष्टतेचा किंवा गॅसचा त्रास आहे त्यांच्यासाठी हे रामबाण औषध आहे. यामुळे सकाळी पोट साफ होण्यास मदत होते.5 / 7रक्ताभिसरण सुधारल्यामुळे चेहऱ्यावरील पिंपल्स कमी होतात आणि त्वचा तजेलदार आणि निरोगी दिसते.6 / 7लाळेतील नैसर्गिक बॅक्टेरियाज शरीराची इम्युनिटी वाढवतात. ज्यामुळे आजारांशी लढण्यास मदत होते.7 / 7सकाळी रिकाम्यापोटी पाणी प्यायल्यानं शरीराचा मेटाबॉलिझ्म रेट वाढतो. ज्यामुळे कॅलरीज लवकर जळतात आणि डोकेदुखीचा त्रास कमी होतो.