Join us
Daily Top 2 Weekly Top 5

१० दिवस गुळाचा चहा प्या - तब्येतीत दिसतील ८ बदल, चहा प्या आणि करा स्वत:चा मेकओव्हर...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2026 18:15 IST

1 / 10
'चहा' हा आपल्यापैकी अनेकांच्या डेली रुटीनचा अविभाज्य भाग आहे. कित्येकांच्या सकाळची सुरुवात ही गरमागरम, वाफाळता चहा पिऊनच होते. पण आरोग्याबाबत जागरूक असलेले अनेकजण आता साखरेच्या चहाऐवजी 'गुळाचा चहा' (Jaggery Tea) पिणं पसंत करतात. परंतु साखरेऐवजी गुळाचा वापर करून बनवलेला चहा तुमच्या आरोग्यासाठी अधिक फायदेशीर ठरू शकतो.
2 / 10
साखर ही शरीरासाठी 'स्लो पॉयझन' मानली जाते, तर गूळ हा लोहाचा आणि खनिजांचा उत्तम स्रोत आहे. पण, जर तुम्ही सलग १० दिवस रोजच्या चहात साखरेऐवजी गुळाचा वापर केला, तर तुमच्या पचनसंस्थेपासून रक्तातील शुद्धतेपर्यंत अनेक बदल दिसू लागतात.
3 / 10
गूळ नैसर्गिकरित्या पाचक गुणयुक्त असतो. १० दिवस गुळाची चहा प्यायल्याने बद्धकोष्ठतेच्या समस्येत आराम मिळतो. जेवणानंतर गुळाची चहा पिण्याने पचन एन्झाइम्स ॲक्टिव्ह होतात, ज्यामुळे अन्न लवकर पचते. पोटात जडपणा किंवा ब्लोटिंग कमी जाणवते.
4 / 10
गूळ हा आयर्नचा खूप चांगला स्रोत आहे. नियमितपणे हा गुळाचा चहा प्यायल्याने शरीरातील रक्ताची कमतरता कमी होण्यास मदत होते. यामुळे थकवा आणि अशक्तपणा कमी होतो आणि आपल्याला इन्स्टंट एनर्जी मिळते. ज्यांना ॲनिमिया किंवा रक्ताची कमतरता आहे, त्यांच्यासाठी सलग १० दिवस गुळाचा चहा पिणे रक्तातील हिमोग्लोबिन वाढवण्यास मदत करते.
5 / 10
गुळामध्ये अँटिऑक्सिडंट्स आणि झिंक, सेलेनियमसारखे खनिज घटक असतात. हे सर्दी, खोकल्यासारख्या हंगामी आजारांपासून संरक्षण करतात. घशातील खवखव कमी करण्यासाठी हे रामबाण उपाय मानले जाते.
6 / 10
गूळ नैसर्गिक डिटॉक्स एजंटप्रमाणे काम करतो, लिव्हर शरीरातील विषारी घटक बाहेर काढण्यास मदत करतो.
7 / 10
साखरेमुळे चरबी वाढते, पण गूळ चयापचय क्रियेला वेगवान करतो. जर तुम्ही डाएटवर असाल, तर साखरेऐवजी गुळाचा चहा घेतल्याने वजन कमी करण्याच्या प्रक्रियेत मदत होते.
8 / 10
गुळामध्ये पोटॅशियम आणि मॅग्नेशियम असते. जर आल्यासोबत गुळाचा चहा घेतला, तर सलग १० दिवसांत सांधेदुखी आणि हाडांच दुखणं कमी होऊन चांगला फरक जाणवतो.
9 / 10
जेव्हा तुमचे रक्त शुद्ध होते आणि पचन सुधारते, तेव्हा त्याचा थेट परिणाम त्वचेवर दिसतो. गुळाच्या चहामुळे पिंपल्स कमी होतात आणि त्वचेला नैसर्गिक चमक मिळते.
10 / 10
साखरेचा चहा प्यायल्याने रक्तातील साखरेची पातळी अचानक वाढते आणि पुन्हा कमी होते, ज्यामुळे थकवा जाणवतो. पण गुळातील कार्बोहायड्रेट्स शरीराला हळूहळू आणि दीर्घकाळ ऊर्जा पुरवतात. सलग १० दिवस हा चहा प्यायल्याने तुम्हाला दिवसभर ॲक्टिव्ह वाटेल.
टॅग्स : आरोग्यहेल्थ टिप्सफिटनेस टिप्सअन्न