By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2026 19:11 IST
1 / 8पूर्वीच्या लोकांचे दीर्घायुष्य आणि १०० वर्षांपर्यंत जगण्यामागे त्यांची नैसर्गिक आणि शिस्तबद्ध जीवनशैली हे मुख्य कारण आहे. (Back To Basics Exploring The Habits Of Our Long Lived Ancestors)2 / 8पूर्वीचे लोक शेतात पिकलेले ताजे, ऋतूंनुसार मिळणारे आणि रासायनिक खतांविरहीत अन्न खात असत. आहारात बाजरी, ज्वारी, नाचणी यांसारख्या भरड धान्यांचा समावेश अधिक असायचा.3 / 8 त्याकाळी आजच्यासारखी प्रगत तंत्र नसल्यामुळे शेतीचं कामं, पाणी भरणं किंवा प्रवासासाठी चालणं यामुळे शरीराचा भरपूर व्यायाम होत असे. ज्यामुळे हृदय आणि स्नायू मजबूत राहायचे.4 / 8लवकर निजे लवकर उठे या नियमांचे ते पालन करायचे. सुर्योद्याला उठणं आणि सुर्यास्तानंतर लगेच जेवून लवकर झोपल्यामुळे त्यांच्या शरीराचे नैसर्गिक चक्र उत्तम काम करायचे.5 / 8सध्याच्या तुलनेत पूर्वी धावपळ आणि स्पर्धा कमी होती. एकत्र कुटूंब पद्धतींमुळे मानसिक आधार मिळायचा. परिणामी तणाव आणि चिंता कमी असायची.6 / 8 किरकोळ आजारांवर ते घरगुती काढे, वनस्पती आणि आयुर्वेदाचा आधार घेत असतं. रासायनिक औषधांचा मारा नसल्यामुळे त्यांची रोगप्रतिकारकशक्ती उपजतच चांगली असायची.7 / 8साखरेऐवजी गुळाचा वापर आणि घाण्याचे शुद्ध तेल मर्यादीत प्रमाणात वापरल्यामुळे त्यांना मधुमेह आणि हृदयविकारासारखे लाईफस्टाईल डिसीज कमी व्हायचे.8 / 8शुद्ध हवा आणि स्वच्छ पाणी यामुळे श्वसनाचे आणि पोटाचे विकार त्यांना सहसा होत नसत. सण वारांच्या निमित्तानं केलेले जाणारे उपवास शरीराला डिटॉक्स करायचे. ज्यामुळे पचनसंस्थेला विश्रांती मिळायची..