उन्हाळ्यात डिहायड्रेशन, उष्माघात, किडनीस्टोनचं दुखणं नको तर 'या' सवयी लगेच बंद करा, राहाल ठणठणीत

Updated:March 10, 2026 15:51 IST2026-03-10T15:42:17+5:302026-03-10T15:51:40+5:30

उन्हाळ्यात डिहायड्रेशन, उष्माघात, किडनीस्टोनचं दुखणं नको तर 'या' सवयी लगेच बंद करा, राहाल ठणठणीत

उन्हाचा पारा वाढू लागला की अनेकांना डिहायड्रेशन, उष्माघात म्हणजेच हिटस्ट्रोक असे त्रास होऊ लागतात.(avoid 3 mistakes in summer to avoid dehydration, heatstroke and kidneystone)

उन्हाळ्यात डिहायड्रेशन, उष्माघात, किडनीस्टोनचं दुखणं नको तर 'या' सवयी लगेच बंद करा, राहाल ठणठणीत

या दिवसांत शरीरातली पाणी पातळीही कमी होते. त्यामुळे किडनी स्टोनचं दुखणंही या दिवसांत उफाळून येतं. म्हणूनच हे सगळे त्रास नको असतील तर उन्हाळ्यात काही सवयी बदलल्याच पाहिजेत. त्या सवयी नेमक्या कोणत्या ते पाहूया..(heatstroke and kidneystone, how to get rid of dehydration, heatstroke and kidneystone in summer)

उन्हाळ्यात डिहायड्रेशन, उष्माघात, किडनीस्टोनचं दुखणं नको तर 'या' सवयी लगेच बंद करा, राहाल ठणठणीत

सगळ्यात पहिलं म्हणजे बहुतांश लोक असे असतात जे तहान लागल्यानंतरच पाणी पितात. पण असं करू नका. उन्हाळ्यात घोट- घोट पाणी नेहमीच पित राहा.. यामुळे शरीरातली पाणी पातळी संतुलित राहण्यास मदत होते. डिहायड्रेशन होत नाही. किडनी स्टोनचा त्रासही वाढत नाही.

उन्हाळ्यात डिहायड्रेशन, उष्माघात, किडनीस्टोनचं दुखणं नको तर 'या' सवयी लगेच बंद करा, राहाल ठणठणीत

दुसरी गोष्ट म्हणजे थंड वाटावं यासाठी बाजारात मिळणारी कोणतीही शितपेयं किंवा फळांचे पॅकबंद ज्यूस पिऊ नका. कारण त्यांच्यामध्ये पौष्टिक असं काहीच नसतं. उलट साखरच जास्त असते. आणि हे ज्यूस पिऊन शरीरात जास्त झालेली साखर जेव्हा शरीराबाहेर काढायची असते तेव्हा शरीरातले पाणीही बाहेर पडते आणि डिहायड्रेशन जास्त वाढते.

उन्हाळ्यात डिहायड्रेशन, उष्माघात, किडनीस्टोनचं दुखणं नको तर 'या' सवयी लगेच बंद करा, राहाल ठणठणीत

त्यामुळे असे पॅकबंद ज्यूस घेणं टाळा. त्याऐवजी ताक, नारळपाणी, पन्हं, लिंबूपाणी अशी आपली पारंपरिक पेयं जास्त प्रमाणात प्या.

उन्हाळ्यात डिहायड्रेशन, उष्माघात, किडनीस्टोनचं दुखणं नको तर 'या' सवयी लगेच बंद करा, राहाल ठणठणीत

उन्हाळ्यात दुपारी १२ ते ४ यावेळेत घराबाहेर पडणं टाळायला हवं. शक्य असेल तर तुमची घराबाहेरची कामं या वेळेत करणं टाळा. कारण या वेळी बाहेर प्रचंड ऊन असतं. त्यामुळे डिहायड्रेशन, हिटस्ट्रोक असे त्रास होऊ शकतात, अशी माहिती डॉक्टरांनी dr_mangesh_bondre या इंस्टाग्राम पेजवर शेअर केली आहे.