1 / 9आपल्या त्वचेमध्ये जे काही बदल होतात किंवा चेहऱ्यावर जे काही बदल दिसतात ते वरवरचे नसतात. तर आपल्या शरीराच्या आत नेमकं काय होत आहे, हे सांगणारी ती वेगवेगळी लक्षणं असतात.2 / 9म्हणूनच आपल्या चेहऱ्याचं थोडं बारकाईने निरिक्षण केलं तर शरीरात होणाऱ्या वेगवेगळ्या बदलांविषयी आपल्याला निश्चितच जाणून घेता येतं. ते नेमकं कसं ओळखायचं याची माहिती drvshakha या इंस्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आली आहे.3 / 9चेहरा सुजला असेल तर ते कदाचित तुमच्या किडनीचं कार्य बिघडलं असल्याचं एक लक्षण असू शकतं किंवा तुम्हाला थायरॉईड संबंधित काही समस्या असू शकते. 4 / 9डोळ्यांखाली काळी वर्तुळं असतील तसेच चेहऱ्यावर पिगमेंटेशन असेल तर तुमच्या लिव्हर आणि किडनीवर जास्त ताण येत आहे हे लक्षात घ्या.5 / 9चेहऱ्यावर कमी वयातच बारीक सुरकुत्या दिसायला लागल्या असतील, तर तुमच्या शरीरात कोलेजीन तसेच प्रोटीन्स कमी प्रमाणात आहेत हे लक्षात घ्या.6 / 9चेहऱ्यावर सतत पिंपल्स येत असतील तर एक तर ते हार्मोन्सचे संतुलन बिघडल्याचं एक लक्षण असू शकतं किंवा मग तुमच्या शरीरातील शुगर वाढत आहेए याचं लक्षण असू शकतं. 7 / 9चेहऱ्यावर बारीक स्पॉट्स दिसत असतील तर ते लिव्हरचं कार्य बिघडल्याचं एक लक्षण आहे. 8 / 9केस पातळ होत असतील आणि हेअर लाईन मागे जाऊन कपाळ मोठं दिसत असेल तर तुमच्या शरीरात प्रोटीन्स कमी आहेत आणि हार्मोन्सही असंतुलित आहेत. 9 / 9चेहऱ्यावर पिवळट झाक दिसत असेल तर तुमच्या शरीरात लोह कमी प्रमाणात आहे.