Join us   

उन्हाचा पारा वाढतोय- उष्माघाताचा त्रास होऊ नये म्हणून ५ गोष्टी करणं कटाक्षाने टाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2024 3:54 PM

1 / 7
मार्च महिन्याच्या शेवटीच उन्हाचा पारा चांगलाच वाढला आहे. दुपारच्या वेळी घराबाहेर पडायला अगदी नकोसे होत आहे. पण तरीही कामानिमित्त काहीजणांना बाहेर जावेच लागते.
2 / 7
अशावेळी उन्हाचा त्रास होऊ नये म्हणून कोणत्या गोष्टी टाळल्या पाहिजेत, याविषयीची माहिती एकदा नक्की बघा. उन्हापासून स्वत:ला सुरक्षित ठेवण्यासाठी एवढं कराच...
3 / 7
कधीही रिकाम्या पोटी घराबाहेर पडू नका. उन्हात बाहेर जायचं असेल तर नेहमी पोटभर जेवून, ताजं अन्न खाऊनच घराबाहेर पडा. मसालेदार, तिखट, तेलकट अन्न उन्हाळ्यात टाळलेलंच बरं.
4 / 7
उन्हात जास्त वेळ उभं राहाणं टाळा. तसेच स्कार्फ, टोपी, गॉगल असं सगळं लावूनच घराबाहेर पडा.
5 / 7
उन्हाळ्याच्या दिवसात घराबाहेर जाताना थंड पाण्याने भरलेली एक बाटली नेहमी सोबत ठेवा.
6 / 7
सुती, सैल कपडे घालूनच घराबाहेर जा. या दिवसात तंग, जाड आणि गडद रंगाचे कपडे घालणं टाळा.
7 / 7
कुलर किंवा एसीच्या थंडगार वाऱ्यातून एकदम कडक उन्हात जाऊ नका. सुरुवातीला काही मिनिटे कुलर, एसी बंद करून रुमटेम्परेचरमध्ये बसा. त्यानंतर उन्हात जा. एकदम गारव्यातून कडक उन्हात गेल्यास ऊन लवकर बाधते.
टॅग्स : समर स्पेशलआरोग्यहेल्थ टिप्सअन्नपाणीउष्माघात