Join us

शरीरातली शुगर वाढत चालली आहे; हे सांगणारी ५ लक्षणं! डायबिटीस मागे लागण्याआधीच सावध व्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2025 17:48 IST

1 / 7
तुमच्या शरीरातली शुगर वाढत चालली आहे, हे सांगणारी काही लक्षणं आपलं शरीर आपल्याला दाखवत असतं. पण आपलं त्याकडे दुर्लक्ष होतं किंवा शरीरात हे बदल नेमके का होत आहेत, हे आपल्या लक्षातच येत नाही.
2 / 7
म्हणूनच हे काही बदल लक्षात घ्या. हे बदल जर तुम्हाला जाणवायला लागले असतील तर वेळीच सावध व्हा. गोड पदार्थ कमी करून व्यायामावर भर द्या. कारण याच वेळी जर योग्य काळजी घेतली गेली नाही तर मधुमेहासारखं दुखणं कायमचं मागे लागू शकतं. ते बदल नेमके कोणते याविषयीची माहिती तज्ज्ञांनी sumanbagriyaa या इंस्टाग्राम पेजवर शेअर केली आहे.
3 / 7
त्यापैकी पहिला बदल म्हणजे वारंवार लघवीला जावं लागणं. शरीरात जास्त झालेली शुगर शरीर बाहेर टाकण्याचा प्रयत्न करतं. त्यामुळे वारंवार लघवीचे प्रमाण वाढते.
4 / 7
वारंवार लघवीला जावं लागल्यामुळे शरीरातलं पाणी कमी होत जातं आणि त्यामुळे तहान लागण्याचेही प्रमाण वाढते. जर तुम्हाला सारखी तहान लागत असेल तर ते ही शरीरातली साखर वाढण्याचं एक लक्षण असतं.
5 / 7
तिसरं लक्षण म्हणजे सतत भूक लागणे. मधुमेह असणाऱ्या व्यक्तीच्या शरीरातली साखर जेवढी पटकन वाढते, तेवढीच पटकन कमी होते. त्यामुळे मग वारंवार भूक लागल्यासारखं होतं.
6 / 7
जर त्वचेच्या टोनमध्ये बदल झाला आहे, मान काळी पडत चालली असेल किंवा त्वचेवर मस येण्याचं प्रमाण वाढलं असेल तर ते ही शुगर वाढण्याचं एक लक्षण आहे.
7 / 7
ब्रेन फॉगचा त्रास. म्हणजेच लक्ष केंद्रित करायला त्रास होणे, विचारक्षमता, निर्णयक्षमता कमी होणे, लहान- सहान गोष्टी विसरून जाणे..
टॅग्स : आरोग्यहेल्थ टिप्समधुमेहपाणी