Join us

५ लक्षणं सांगतात किडनीचं आरोग्य बिघडू लागलंय! वेळेत ‘हे’ बदल वाचवतील किडनी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2025 20:22 IST

1 / 11
किडनीचे वेगवेगळे आजार पाठीमागे लागण्याचं प्रमाण हल्ली खूप जास्त वाढत चाललं आहे. यामागचं महत्त्वाचं कारण म्हणजे आपली बदललेली जीवनशैली..
2 / 11
खाण्यापिण्याच्या सवयी एवढ्या जास्त बदलून गेल्या आहेत की ते बदल आपल्या शरीराला स्वीकारणंही जड जात आहे. त्यामुळेच तर कमी वयात वेगवेगळे अवयक निकामी होण्याचं प्रमाण वाढलं आहे.
3 / 11
त्यापैकी आपल्या किडनीचं आरोग्याविषयी सांगणारी ही काही लक्षणं पाहून घ्या.. पुढे सांगितलेले काही त्रास तुम्हाला वारंवार जाणवत असतील तर एकदा किडनीरोग तज्ज्ञांचा सल्ला घेतलेला चांगला.
4 / 11
clevelandclinic यांनी दिलेल्या माहितीनुसार नेहमीच खूप थकवा येणे, अंगात खूप आळस असणे, नॉशिया हे काही बरं लक्षणं नाही.
5 / 11
किडनीचा त्रास असणाऱ्या रुग्णांच्या हातावर, पायावर आणि चेहऱ्यावर नेहमीच सूज आलेली दिसते.
6 / 11
लघवीला वारंवार जावं लागत असेल किंवा लघवीचा रंग नेहमीच गडद पिवळा असेल तर एकदा डॉक्टरांचा सल्ला घ्या.
7 / 11
त्वचा खूप कोरडी होणे आणि वारंवार खाज येणे हा त्रासही किडन्यांचे कार्य नीट होत नसेल तर होऊ शकतो.
8 / 11
पायांमध्ये नेहमीच गोळे येणे, भूक न लागणे, काही खाण्याची इच्छा न होणे.. याप्रकारची लक्षणं तुमच्या किडनीच्या बिघडलेल्या आरोग्याविषयी सांगतात.
9 / 11
किडन्यांचं आरोग्य उत्तम ठेवायचं असेल तर भरपूर पाणी प्यायला हवं. तसेच आहारातील मिठाचं प्रमाण कमी करावं.
10 / 11
थोडंसं काही दुखलं की लगेच वारंवार स्वत:च्या मनानेच पेन किलर घेणे टाळावे. या गोळ्यांचा किडन्यांवर खूप वाईट परिणाम होतो.
11 / 11
मद्यपान, धुम्रपान अशा व्यसनांमुळेही किडन्यांचा त्रास वाढतो.
टॅग्स : आरोग्यहेल्थ टिप्सअन्नपाणीलाइफस्टाइल