Join us
Daily Top 2 Weekly Top 5

पोट नेहमी बिघडलेलंच असतं? ५ पदार्थ रोज खा, पचनाचे सगळे त्रास थांबतील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2026 12:56 IST

1 / 8
काही जणांना पोटाचे खूप वेगवेगळे त्रास असतात. त्यांचं पोट नेहमीच बिघडलेलं असतं. कधी लूज मोशन्स असतात तर कधी काॅन्स्टीपेशन, पोट जड होणे, फुगल्यासारखे वाटणे, गुबारून जाणे, गॅसेस, ॲसिडीटी असे त्रासही अधूनमधून छळत असतात.(5 foods that helps to improve gut health)
2 / 8
पोटाच्या या सगळ्या तक्रारी कमी करायच्या असतील तर पुढे सांगितलेले काही पदार्थ रोजच तुमच्या आहारात असू द्या. यामुळे पचनक्रिया नैसर्गिकपणे सुधारण्यास मदत होईल. ते पदार्थ नेमके कोणते याविषयीची माहिती डॉक्टरांनी doctor.sethi या इंस्टाग्राम पेजवर शेअर केली आहे.(how to get relief from gut health issues?)
3 / 8
दही, ताक यासारखे पदार्थ रोज खा. हे पदार्थ ताजेच हवेत. शिवाय ते घरी तयार केलेले असतील तर अधिक उत्तम. बाजारात विकत मिळणारे फ्लेवर्ड दही, पॅकबंद ताक पिणे मात्र टाळायला हवे.
4 / 8
फायबरयुक्त पदार्थही जास्त प्रमाणात खायला हवे. आहारातले फायबर पचनक्रिया अधिक चांगली होण्यासाठी मदत करतात.
5 / 8
स्ट्रॉबेरी, रासबेरी अशी बेरी प्रकारातली फळंही नियमितपणे खायला हवी.
6 / 8
भोपळ्याच्या बिया, चिया सीड्स यांच्यामध्येही चांगल्या प्रमाणात फायबर आहेत. ते देखील खायला हवे. त्यांच्यासोबत बेरी प्रकारातली फळं खाल्ल्याने त्यांच्यातल्या फायबरचा जास्त चांगला फायदा आपल्या शरीराला होतो.
7 / 8
पनीर, टोफू, मुगाची डाळ, कडधान्ये असे प्रोटीनयुक्त पदार्थ नियमितपणे खा. पचनक्रिया चांगली ठेवण्यासाठी प्रोटीनयुक्त आहारही खूप फायदेशीर ठरतो.
8 / 8
वेगवेगळ्या प्रकारचा सुकामेवा, घरी तयार केलेलं साजूक तूप, अव्हाकॅडो अशा प्रकारचे हेल्दी फॅट्स असणारे पदार्थही नियमितपणे खा.
टॅग्स : आरोग्यहेल्थ टिप्सअन्नफळे