Join us

तुम्ही जास्त साखर खाताय हे सांगणारी १० लक्षणं, शरीर साखरेनं पोखरण्यापूर्वी व्हा जागे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2025 16:00 IST

1 / 10
साखर आपल्या शरीरासाठी मुलभूत स्त्रोत मानली जाते. फळे आणि दुग्धजन्य पदार्थांमध्ये आढळणारी नैसर्गिक साखर फायबर आणि पोषक तत्वांमुळे आरोग्यासाठी कमी हानिकारक असते.
2 / 10
जर तुम्हालाही अति प्रमाणात साखर खाण्याची सवय जडली असेल तर हे गंभीर आजार जडू शकतात. याविषयी तुम्हाला माहित असायला हवं. (sugar craving causes)
3 / 10
जास्त प्रमाणात साखर खाल्ल्याने भूक वाढू शकते. यात प्रथिने आणि फायबर सारख्या पोषक तत्वांचा अभाव असतो. ज्यामुळे वजन वाढू शकतं. (10 signs eating too much sugar)
4 / 10
साखरेचे सेवन अधिक केल्यास चेहऱ्यावर पुरळ, मुरुमे आणि अकाली वृद्धत्व येते.रक्तातील साखरेची पातळी वाढल्याने जळजळ आणि हार्मोन्स असंतुलित होऊ शकतात.
5 / 10
संशोधनातून असं समजलं आहे की, साखरेचा संबंध रक्तदाबाशी जोडण्यात आला आहे. साखरयुक्त पेयांमधून उच्च रक्तदाब आणि हृदयविकाराचा धोका वाढतो.
6 / 10
जास्त साखरेचा आहार झोपेच्या पद्धतीवर परिणाम करतात. जेव्हा रक्तातील साखरेच्या पातळीत चढ-उतार होतो तेव्हा झोप न येण्याची समस्या निर्माण होते.
7 / 10
साखरेमुळे शरीराला ऊर्जा मिळत असली तरी ती काही प्रमाणातच असते. यामुळे ऊर्जेची पातळी कमी होते. थकवा आणि ऊर्जेची कमतरता जाणवू शकते.
8 / 10
साखरेचे प्रमाण जास्त झाल्यास शरीरात जळजळ होऊ शकते. ज्यामुळे सांधेदुखीचा त्रास सुरु होतो. यामुळे अस्वस्थता वाढते.
9 / 10
साखरेमुळे तोंडात बॅक्टेरिया तयार होतात. आम्ल तयार होऊन दातांमध्ये पोकळी निर्माण करते किंवा दात खराब होतात.
10 / 10
रक्तातील साखरेच्या पातळीत चढ-उतार होऊन मूडवर परिणाम करतो. ज्यामुळे मूड स्विंग होऊन चिडचिडेपणा वाढतो.
टॅग्स : आरोग्यहेल्थ टिप्सआहार योजना