Gardening tips : किचनमधला कचरा रोपांसाठी सुपर टॉनिक! ‘असा’ वापरा, बाग बहरेल फुलांनी रोज
Updated:July 9, 2025 16:27 IST2025-07-09T09:23:02+5:302025-07-09T16:27:23+5:30

फळांची, भाज्यांची सालं, टरफलं किंवा स्वयंपाक घरातून निघणारा कचरा बागेतल्या रोपांसाठी एखाद्या टॉनिकसारखा ठरतो.
त्याचा जर योग्य वापर केला तर तुमच्या बागेल्या रोपांना वेगळं कोणतंच विकतचं खत घालण्याची गरज पडणार नाही. त्यासाठी स्वयंपाक घरातल्या कचऱ्याचा कसा वापर करायचा ते पाहूया..
केळीची सालं फुलझाडांसाठी खूप उपयोगी ठरतात. केळीची सालं पाण्यात भिजत घाला आणि ८ ते १० तासांनी ते पाणी गाळून घ्या. जेवढं पाणी असेल त्याच्या तिप्पट साधं पाणी त्यात मिसळा आणि ते पाणी रोपांना द्या. भरपूर फुलं येतील.
रोपांची चांगली वाढ होण्यासाठी कांद्याची टरफलंही खूप उपयुक्त ठरतात. त्यासाठी कांद्याची सालं पाण्यात रात्रभर भिजत घाला. दुसऱ्या दिवशी ते पाणी गाळून घ्या आणि त्यात तेवढंच साधं पाणी घाला. हे पाणी रोपांना दिल्यास रोपांची चांगली वाढ होते.
भाज्यांच्या काड्या, सालं हे सगळं बादलीमध्ये जमा करावं. त्यात पाणी आणि थोडा गूळ घालून ते १० ते १२ तास पाण्यात भिजत ठेवावं. त्यानंतर पाणी गाळून घ्यावं आणि हे पाणी रोपांना थोडं थोडं द्यावं. यातून रोपांना कित्येक पौष्टिक घटक मिळतात.
आंबट झालेलं ताक प्यायला जात नाही. ताक जेवढं असेल त्याच्या तिप्पट त्यात पाणी घाला आणि ते पाणी बागेतल्या रोपांना द्या.
रोजच्या रोज डाळ - तांदूळ धुतल्याचं जे पाणी असतं ते सुद्धा बागेतल्या रोपांसाठी खूप उपयुक्त ठरतं.
रोजचा चहा गाळल्यानंतर जी चहा पावडर उरते ती धुवून घ्या आणि उन्हात पसरवून वाळू द्या. त्यानंतर ती रोपांना द्या. माती भुसभुशीत, कसदार करण्यासाठी ती उपयुक्त ठरते.