इनडोअर प्लांट्स चांगले वाढत नाहीत? कुंडीतल्या मातीत किचनमधले ५ पदार्थ मिसळा- रोपं वाढतील भराभर
Updated:July 14, 2025 14:01 IST2025-07-14T13:51:56+5:302025-07-14T14:01:51+5:30

आपण मोठ्या हौशीने इनडोअर प्लांट्स लावतो. साध्या नेहमीच्या रोपांपेक्षा ते जरा महागही असतात. तरीही आपण ते आणतो. पण काही दिवसांतच ते कोमेजायला लागतात. ते एवढे नाजुक असतात की त्यांना पाणीही जपूनच घालावं लागतं.
मग अशावेळी खत कोणतं घालायचं हा प्रश्नही पडतोच.. म्हणूनच हे काही घरगुती खत पाहा. आपल्या स्वयंपाक घरातले काही पदार्थ इनडोअर प्लांट्ससाठी सर्वोत्तम खत ठरू शकतात (best home made fertilizers for indoor plants). कोणत्या रोपाला कोणतं खत घालायचं ते आता पाहूया..(best natural fertilizers for the fast growth of indoor plants)
पीस लीली, झेड झेड प्लांट, कॅलाथिया या रोपांसाठी कॉफी पावडर उत्तम ठरते. १५ ते २० दिवसांतून एकदा १ टीस्पून कॉफी पावडर त्यांना पुरेशी ठरते.
फ्लेमिंग लीली, कॉर्न प्लांट, रबर प्लांट यांच्यासाठीचं अतिशय उत्तम असं घरगुती खत म्हणजे तांदळाचं पाणी.
स्नेक प्लांटची चांगली वाढ होण्यासाठी त्याला केळीच्या सालींचं पाणी नियमितपणे द्या.
कोरफड, स्पायडर प्लांट, पीस लीली यांच्यासाठी बेकिंग सोडा खूप चांगलं खत ठरतो. यासाठी १ कप पाण्यात १ टीस्पून बेकिंग सोडा घाला आणि ते पाणी रोपांना द्या.
कॅक्टस प्रकारातले इनडोअर प्लांट्स तसेच झेड झेड प्लांंट यांच्यासाठी दालचिनीची पावडर एखाद्या खताप्रमाणे काम करते.