Terrace decoration ideas: छोट्याशा बाल्कनीलाही द्या खास रंगरूप, टेरेस डेकोरेशनच्या 9 भन्नाट आयडीया; घराला द्या नवा चेहरा

Published:February 28, 2022 04:45 PM2022-02-28T16:45:33+5:302022-02-28T17:17:21+5:30

Terrace decoration ideas: छोट्याशा बाल्कनीलाही द्या खास रंगरूप, टेरेस डेकोरेशनच्या 9 भन्नाट आयडीया; घराला द्या नवा चेहरा

१. फ्लॅट संस्कृतीत रमल्यामुळे आता घराचं अंगण हरवलंय हे अगदी खरं.. पण आपल्या फ्लॅटच्या छोट्याशा बाल्कनीचं (terrace decoration) किंवा टेरेसचं रूपडं आपण नक्कीच बदलू शकतो... आपलं छोटंसं टेरेसही बनू शकतं आपल्या घराची एनर्जी..

Terrace decoration ideas: छोट्याशा बाल्कनीलाही द्या खास रंगरूप, टेरेस डेकोरेशनच्या 9 भन्नाट आयडीया; घराला द्या नवा चेहरा

२. टेरेसला (terrace garden) किंवा बाल्कनीला छान सजवायचंय म्हणून खूप काही पैसे खर्च करावे लागतील असं अजिबात नाही. अगदी आपल्याला परवडणाऱ्या वस्तू घेऊन आपण आपल्या टेरेसचा चेहरामोहरा बदलून टाकू शकतो. त्यासाठी काढा फक्त थोडासा वेळ आणि मदत घ्या या काही आयडियांची..

Terrace decoration ideas: छोट्याशा बाल्कनीलाही द्या खास रंगरूप, टेरेस डेकोरेशनच्या 9 भन्नाट आयडीया; घराला द्या नवा चेहरा

३. टेरेस डेकोरेशनची सुरुवात अर्थातच आपल्या टेरेसमध्ये असणाऱ्या कुंड्यांपासून होते.. सध्या ज्या कुंड्या टेरेसमध्ये आहेत, त्यांची छान रंगरंगाेटी करा.. त्यांना नवा चेहरा द्या.. गरज पडल्यास त्या कुंड्यांना जोड म्हणून काही कुंड्या नव्या घ्या.. आकर्षक पद्धतीने कुंड्यांची मांडणी करा.

Terrace decoration ideas: छोट्याशा बाल्कनीलाही द्या खास रंगरूप, टेरेस डेकोरेशनच्या 9 भन्नाट आयडीया; घराला द्या नवा चेहरा

४. एखादी रिलॅक्स होण्याची कल्पना जेव्हा आपण करतो तेव्हा आपल्याला हमखास झोक्याची आठवण येते.. त्यामुळे झोक्यात बसल्या बसल्या पुस्तक वाचणे, चहा- कॉफी पिणे असे काही रिलॅक्सिंग मोमेंट्स अनुभवायचे असतील, तर टेरेसमध्ये झोका हवाच..

Terrace decoration ideas: छोट्याशा बाल्कनीलाही द्या खास रंगरूप, टेरेस डेकोरेशनच्या 9 भन्नाट आयडीया; घराला द्या नवा चेहरा

५. टेरेसमध्ये आपण काही काळ घालविणार आहोत. त्यामुळे तिथे निवांत बसण्यासाठी बैठक हवीच.. त्यामुळे आपल्या आवडीनुसार आणि जागेची मर्यादा लक्षात घेऊन गार्डन फर्निचरची निवड करा.. दोन खुर्च्या आणि एखादे कॉफी टेबल तुमच्या बाल्कनीची शोभा वाढवतील.

Terrace decoration ideas: छोट्याशा बाल्कनीलाही द्या खास रंगरूप, टेरेस डेकोरेशनच्या 9 भन्नाट आयडीया; घराला द्या नवा चेहरा

६. बाल्कनीतले फर्निचर किंवा शोभेच्या वस्तू या नेहमी ब्राईट रंगाच्या निवडा. निळा, गुलाबी, पिवळा हे रंग झाडांच्या हिरवळीत अधिक उठून दिसतात, आकर्षक वाटतात.

Terrace decoration ideas: छोट्याशा बाल्कनीलाही द्या खास रंगरूप, टेरेस डेकोरेशनच्या 9 भन्नाट आयडीया; घराला द्या नवा चेहरा

७. तुमच्या टेरेसमध्ये जी काही भिंत आहे, तिचा तुम्ही सजावटीसाठी खूप छान उपयोग करून घेऊ शकता. अशा पद्धतीची शोपीस किंवा झाडांच्या लटकत्या कुंड्या टेरेसच्या भिंतींचा लूक बदलून टाकतात.

Terrace decoration ideas: छोट्याशा बाल्कनीलाही द्या खास रंगरूप, टेरेस डेकोरेशनच्या 9 भन्नाट आयडीया; घराला द्या नवा चेहरा

८. बाल्कनीचा एखादा कॉर्नर छान शोपीस वापरून सजवा. आजकाल गार्डन मिनी क्रियेचर या संकल्पनेची चांगलीच क्रेझ आहे. अशा पद्धतीने बाल्कनीचा एखादा कोपरा सजविला तरी बघणाऱ्याला तो सुखावून जातो. ऑनलाईन शॉपिंग साईट्सवर असे अनेक पर्याय उपलब्ध आहेत.

Terrace decoration ideas: छोट्याशा बाल्कनीलाही द्या खास रंगरूप, टेरेस डेकोरेशनच्या 9 भन्नाट आयडीया; घराला द्या नवा चेहरा

९. भिंतीला आणि जमिनीला तुम्ही अशा पद्धतीने वॉलपेपर लावून सजवू शकता. फक्त ज्या भिंतीला पाणी लागणार नाही, अशाच ठिकाणी या वॉलपेपरचा वापर करा.

Terrace decoration ideas: छोट्याशा बाल्कनीलाही द्या खास रंगरूप, टेरेस डेकोरेशनच्या 9 भन्नाट आयडीया; घराला द्या नवा चेहरा

१०. आवडत असल्यास टेरेसच्या एखाद्या भिंतीवर तुम्ही वारली पेंटींगही करू शकता. घर मॉडर्न असलं तरी बाल्कनीचा असा ट्रॅडिशनल लूक खूप छान आणि रिलॅक्सिंग वाटतो.

Terrace decoration ideas: छोट्याशा बाल्कनीलाही द्या खास रंगरूप, टेरेस डेकोरेशनच्या 9 भन्नाट आयडीया; घराला द्या नवा चेहरा

११. आर्टिफिशियल लॉनचा खूप छान पर्याय आता उपलब्ध आहे. तुमच्या बाल्कनीचा आकार बघा आणि असं मस्त लॉन टाकून तुमची बाल्कनी सजवा.