lokmat Supervote 2024
Lokmat Sakhi >Gardening > उन्हामुळे कुंडीतली माती काेरडी पडून रोपं सुकतात? ३ उपाय- माती राहील ओलसर- रोपं हिरवीगार

उन्हामुळे कुंडीतली माती काेरडी पडून रोपं सुकतात? ३ उपाय- माती राहील ओलसर- रोपं हिरवीगार

Gardening Tips For Summer: उन्हाळ्यातही कुंडीतली माती ओलसर राहावी आणि आपली बाग कायम हिरवीगार, टवटवीत असावी, यासाठी हे काही उपाय करून बघा (How to take care of plants in summer)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2024 03:56 PM2024-04-20T15:56:40+5:302024-04-20T15:57:33+5:30

Gardening Tips For Summer: उन्हाळ्यातही कुंडीतली माती ओलसर राहावी आणि आपली बाग कायम हिरवीगार, टवटवीत असावी, यासाठी हे काही उपाय करून बघा (How to take care of plants in summer)

How to take care of plants in summer, gardening tips for summer, how to maintain moisture in soil in summer | उन्हामुळे कुंडीतली माती काेरडी पडून रोपं सुकतात? ३ उपाय- माती राहील ओलसर- रोपं हिरवीगार

उन्हामुळे कुंडीतली माती काेरडी पडून रोपं सुकतात? ३ उपाय- माती राहील ओलसर- रोपं हिरवीगार

Highlights कुंडीतली माती नेहमीच ओलसर राहावी आणि आपली बाग हिरवीगार दिसावी यासाठी काय उपाय करायचे ते पाहा..

उन्हाळ्यात रोपांना कितीही पाणी टाकलं तरी कुंडीतली माती उष्णतेमुळे लवकर सुकते. त्यामुळे या दिवसांत झाडांची जरा विशेष काळजी घ्यावी लागते. कारण उन्हामुळे रोपं सुकून जातात. बऱ्याचदा झाडांना पाणी घातलं तरी ते पुरेसे होत नाही. उन्हामुळे माती पुन्हा कोरडी पडते. माती कोरडी पडली की रोपं पुन्हा माना टाकतात (How to take care of plants in summer). त्यामुळे असं होऊ नये म्हणून आणि कुंडीतली माती नेहमीच ओलसर राहावी (gardening tips for summer) आणि आपली बाग हिरवीगार दिसावी यासाठी काय उपाय करायचे ते पाहा.. (how to maintain moisture in soil in summer)

कुंडीतील माती ओलसर राहावी यासाठी उपाय?

 

१. सुकलेल्या पानांचा वापर

कुंडीमधे रोपाच्या आजूबाजूला जी माती असते, त्या मातीवर झाडांची गळालेली पाने टाकून ठेवा.

केसांना मेहेंदी लावण्याचा कंटाळा? बघा फूड कलर वापरून झटपट केस रंगविण्याचा भन्नाट उपाय 

यामुळे मातीवर वाळलेल्या पानांचे एक आच्छादन तयार होईल. यामुळे मातीवर थेट सुर्यप्रकाश पडणार नाही आणि माती ओलसर राहण्यास मदत होईल.

 

२. रंगबिरंगी पेबल्सचा वापर

कुंडीमधल्या मातीवर काही पेबल्स ठेवले तर सूर्यप्रकाश थेटमाती पर्यंत जाणार नाही. त्यामुळे माती बराच वेळ ओली राहण्यास मदत होईल. बजारात किंवा ऑनलाईन शॉपिंग साईटवर खूप छान आकर्षक आकाराचे आणि रंगांचे पेबल्स मिळतात.

हॉटेलमधली गरमागरम तंदुरी रोटी खाणं पडेल महागात- लठ्ठपणा, डायबिटीससोबतच मागे लागतील 'हे' आजार

ते छान पद्धतीने कुंडीतल्या मातीत रचून ठेवले तर त्यामुळे तुमच्या छोट्याशा बागेला आणखी शोभा येईल. पण पेबल्समुळे रोपाचे इवलेसे खोड दबून जाणार नाही याची मात्र काळजी घ्या. शिवाय आठवड्यातून दोन दिवस तरी ते काढून ठेवा आणि सूर्यप्रकाश थेट मातीपर्यंत जाऊ द्या.

 

३. झाडांना पाणी देण्याची वेळ 

उन्हाळ्याच्या दिवसात झाडांना शक्यतो रात्रीच्या वेळी पाणी घालावे.

वजन, शुगर वाढेल म्हणून आंबा खात नसाल तर अमेरिकन डायबेटिक असोसिशनचा हा सल्ला वाचाच....

दिवसा पाणी घातले तर उष्णतेमुळे पुन्हा लगेच काही तासांत माती कोरडी पडते. पण रात्री उष्णता कमी असल्याने माती अधिक काळ ओलसर राहण्यास मदत होते. 

 

Web Title: How to take care of plants in summer, gardening tips for summer, how to maintain moisture in soil in summer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.