पावसाळ्यात डास वाढण्याआधीच घरात लावा ५ रोपं! डास तुमच्या घराकडे फिरकणारच नाहीत

Updated:May 24, 2025 16:41 IST2025-05-24T16:34:09+5:302025-05-24T16:41:55+5:30

पावसाळ्यात डास वाढण्याआधीच घरात लावा ५ रोपं! डास तुमच्या घराकडे फिरकणारच नाहीत

पावसाळा सुरू झाला की ठिकठिकाणी पाणी तुंबून राहाते. त्यामुळे मग त्या पाण्यात डासांची वाढ होते आणि रोगराई पसरते.(5 tips to keep your house free from mosquito)

पावसाळ्यात डास वाढण्याआधीच घरात लावा ५ रोपं! डास तुमच्या घराकडे फिरकणारच नाहीत

अगदी घरातही खूप डास होतात आणि विशेषत: संध्याकाळनंतर ते कडाकड चावून हैराण करतात. यासाठी मॉस्किटो रिपेलंट क्रिम आणि औषधी असतात. पण शेवटी ते सगळे केमिकलयुक्त असल्याने त्यांचा वापर करण्यावर मर्यादाच येतात.(how to keep mosquito away from house?)

पावसाळ्यात डास वाढण्याआधीच घरात लावा ५ रोपं! डास तुमच्या घराकडे फिरकणारच नाहीत

म्हणूनच आता तुमच्या घरातले डास पळवून लावण्यासाठी हा एक सोपा नॅचरल उपाय करा (5 mosquito repellent plants). आपल्याकडे अशी काही रोपं आहेत ज्यांच्या वासामुळे डास आपल्या आजुबाजुला फिरकतही नाहीत. ती रोपं तुम्ही या दिवसांत आवर्जून लावा. त्यामुळे घरातल्या आणि घराच्या आजुबाजुच्या परिसरातल्या डासांचे प्रमाण नक्कीच कमी होईल.

पावसाळ्यात डास वाढण्याआधीच घरात लावा ५ रोपं! डास तुमच्या घराकडे फिरकणारच नाहीत

जांभळट निळ्या रंगाची नाजुक फुलं येणाऱ्या लव्हेंडर या रोपाचा सुगंध आपल्याला खूप आवडतो, पण तो डासांना अजिबात सहन होत नाही. त्यामुळे हे रोप असणाऱ्या ठिकाणी डास अजिबात फिरकत नाहीत.

पावसाळ्यात डास वाढण्याआधीच घरात लावा ५ रोपं! डास तुमच्या घराकडे फिरकणारच नाहीत

लेमन ग्रास किंवा गवती चहा या रोपामुळेही घरातले डास कमी होण्यास मदत होते. स्वयंपाक घरातल्या खिडकीत हे रोप तुम्ही ठेवू शकता. यामुळे स्वयंपाक घरातले डासही कमी होतील आणि गवती चहाचा आस्वादही झटपट घेता येईल.

पावसाळ्यात डास वाढण्याआधीच घरात लावा ५ रोपं! डास तुमच्या घराकडे फिरकणारच नाहीत

तुळशीचं रोपही डासांचे प्रमाण कमी करण्यास मदत करते. तुळशीच्या तेलात पाणी घालून ते घरभर शिंपडल्यास डासांचे प्रमाण कमी होईल.

पावसाळ्यात डास वाढण्याआधीच घरात लावा ५ रोपं! डास तुमच्या घराकडे फिरकणारच नाहीत

डासांना पळवून लावण्यासाठी आणि हवा शुद्ध ठेवण्यासाठी पुदिन्याच्या रोपाचीही खूप मदत होते.

पावसाळ्यात डास वाढण्याआधीच घरात लावा ५ रोपं! डास तुमच्या घराकडे फिरकणारच नाहीत

झेंडूच्या फुलांचा सुगंधही डासांना सहन होत नाही. त्यामुळे ज्याठिकाणी झेंडूची रोपं किंवा फुलं असतात तिथे जास्त डास दिसत नाहीत.