1 / 7फक्त भारतातच नाही तर जगभरात फूड कॉम्बिनेशन ही संकल्पना फार प्रसिद्ध आहे. दोन पदार्थ एकत्र करुन खाण्याची मज्जा काही वेळीच असते. जसे की जिलबी आणि रबडी, भातासोबत एखादी भाजी असे अनेक पदार्थांचे मिश्रण आपण करतो आणि आवडीने खातो. 2 / 7मात्र असेही काही अवली असतात ज्यांना दोन पदार्थ जे एकत्र करणे आरोग्यासाठी फार वाईट ठरु शकते. त्या कॉम्बिनेशनचा विचारही लोकं करणार नाहीत. तरीही त्यांनी तयार केलेले हे पदार्थ मोठ्या प्रमाणावर प्रसिद्धही होतात आणि विकले जातात. असेच काही पदार्थ आहेत ऐकून थक्कच व्हाल. 3 / 7मध्यंतरी चॉकलेट नूडल्स फार व्हायरल होत्या. नूडल्स म्हणजे चमचमीत तिखटच हव्या. पण त्यात चॉकलेट सिरप घालून मग मसाला आणि नूडल्स घालून अनेक जणांनी खाल्ले त्याचा व्हिडिओही सोशल मिडियावर टाकला काहींना त्याची चव फार आवडलीही. 4 / 7पाणीपुरी म्हणजे लोकांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. पाणीपुरी खाताना आनंद, समाधान सारेच मिळते. पोटालाही त्याचा फार त्रास होत नाही. त्यामुळे लोकं आवडीने खातात. मात्र काही ठिकाणी पाणीपुरी आइस्क्रिम हा प्रकार मिळतो. पुऱ्यांमध्ये मसाला भरल्यावर त्यामध्ये आइस्क्रिमही भरले जाते. 5 / 7कांदा भजी, बटाटा भजी, पालक भजी हे प्रकार आपण आवडीने खातो. मात्र काही जण ओरिओ भजी खातात. ओरिओचे बिस्किट बेसनात बुडवून तळायचे आणि सॉससोबत खायचे. विचारानेच विचित्र वाटले तरी अनेकजण हा पदार्थ करुन पाहतात. 6 / 7भारतीयांसाठी गुलाबजाम हा एक फार आवडीचा पदार्थ आहे. कोणताही सण असला तरी घरी गोडासाठी गुलाबजाम केला जातो. गुलाबजाम प्रेमींना ऐकून धक्काच बसेल की लोकं गुलाबजाम बर्गर खातात. पावात गुलाबजाम भरला जातो त्यावर काही सॉस ओतले जातात आणि लोकं आवडीने खातात. 7 / 7डोसा हा प्रकार फार आवडीने खाल्ला जातो. त्यात अनेक प्रकारचे डोसे असतात. मसाला, घी, साधा, मैसूर मात्र काही ठिकाणी आइस्क्रिम डोसाही खाल्ला जातो. चटणीऐवजी आइस्क्रिमचे फ्लेवर दिले जातात. डोश्यावर चॉकलेट सिरप ओतले जाते.