1 / 7हिवाळ्यात एकदम मस्त मिळणारा पदार्थ म्हणजे मटार. बाजारात एकदम मस्त ताजे मटार मिळतात. तसेच कोवळे टपोरे मटार स्वस्तही मिळतात. गल्लोगलल्ली मटारचे विक्रेते दिसतात. हिवाळ्यात मटारचे विविध प्रकार करा. 2 / 7मटार पुलाव हा भाताचा फार लोकप्रिय असा प्रकार आहे. करायला अगदी सोपा आहे. तसेच मटार पुलाव करायची प्रत्येकाची रेसिपी खास वेगळी असते. असाच करायला हवा तसाच करायला हवा असे काही नियम नाही. आवडीनुसार करता येतो. 3 / 7मटार पराठा एकदा खाल्ला तर पुन्हा नक्की कराल, इतका चविष्ट लागतो. ताज्या गोडसर दह्यासोबत मटार पराठा एकदम चविष्ट लागतो. मैदा न वापरता गव्हाचे पीठ वापरुन करा पौष्टिकही लागतो. लसूण घालायला अजिबात विसरु नका. 4 / 7हॉटेलमध्ये मिळणारी फार लोकप्रिय डीश म्हणजे मटार पनीर. लोकं गेली अनेक वर्षे मटार पनीर आवडीने खात आहेत. भातासोबत, पोळीसोबत तसेच भाकरीसोबत ही भाजी मस्त लागते. 5 / 7मटार टिक्की किंवा मटारचे कटलेट फारच कुरकुरीत होतात. त्यात थोडा मैदा, तांदळाचे पीठ, आवडते मसाले, आलं-लसूण पेस्ट असे सारे पदार्थ घालून मिश्रण तयार करायचे. टिक्की कुरकुरीत परतायची. 6 / 7सगळे आवडीने खातात असे स्टार्टर म्हणजे हराभरा कबाब. हे कबाब करताना त्यात महत्वाचा पदार्थ मटारच असतो. भरपूर मटार, पालक आणि मग इतर हिरव्या भाज्यांची पेस्ट वापरली जाते. 7 / 7नारळ, कांदा, सुकं वाटण, मसाले इतर काही पदार्थ परतून मस्त मटार आमटी करता येते. भातासोबत खाायला अगदी परफेक्ट असा पदार्थ आहे. नक्की करुन पाहा. तसेच त्याला वरतून लाल तिखटाची फोडणी द्या. म्हणजे चव वाढेल.