Join us

घराबाहेर पडताना आई तुम्हाला आवर्जून दही-साखर देते का? फायदे समजल्यावर रोजच मागाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2025 16:50 IST

1 / 8
जेव्हा जेव्हा मुलं काही महत्त्वाच्या कामासाठी घराबाहेर पडतात तेव्हा आई त्यांना आवर्जून एक चमचा दही-साखर खायला देते. सर्वांनी पाहिलं आहे. पण तुम्ही कधी विचार केला आहे का की हे का केलं जातं, त्यामागील कारण काय आहे? घराबाहेर पडण्यापूर्वी दही-साखर खाणं महत्त्वाचं का आहे?
2 / 8
दही-साखर खाऊ घालणं ही भारतातील एक सामान्य परंपरा आहे. तुम्ही परीक्षेसाठी जात असाल, मुलाखतीसाठी जात असाल किंवा काही महत्त्वाच्या कामासाठी जात असाल, तुमची आजी किंवा तुमची आई नक्कीच म्हणते, 'जाण्यापूर्वी दही-साखर खा.' यामागील खास कारण काय आहे ते जाणून घेऊया...
3 / 8
साखर ही ग्लुकोजचा एक सोपा सोर्स आहे आणि दही प्रोटीनसाठी चांगलं आहे. जेव्हा आपण घराबाहेर पडतो तेव्हा दही आणि साखर आपल्याला लगेचच ऊर्जा देतात आणि दिवसभराच्या आव्हानांसाठी शरीराला तयार करतात.
4 / 8
दह्यामध्ये असलेले चांगले बॅक्टेरिया पचनसंस्था मजबूत करतात. यामुळे बाहेर तणावपूर्ण वातावरण असलं किंवा अन्न खराब असलं तरीही पोटाच्या समस्या होण्याचा धोका कमी होतो.
5 / 8
उन्हाळ्यात दही आणि साखर थंडावा देतात. कडक ऊन आणि हीट स्ट्रोकपासून संरक्षण करण्यासाठी हा घरगुती उपाय खूप प्रभावी आहे.
6 / 8
जेव्हा तुम्ही परीक्षा, मुलाखत किंवा कोणत्याही मोठ्या कामामुळे तणावात असता तेव्हा दही- साखर तुमचा मूड त्वरित सुधारतो. त्याची गोड चव मनाला शांत ठेवते. ज्यामुळे तुम्ही शांत राहता आणि तुमचा आत्मविश्वास वाढतो.
7 / 8
यामध्ये एक चांगली भावना देखील आहे. जेव्हा कोणी गोड पदार्थ खाऊन घराबाहेर पडतं तेव्हा वडीलधाऱ्यांना वाटतं की सर्व काही ठीक होईल. या सकारात्मक विचारसरणीचा आपल्या कामगिरीवर थेट परिणाम होतो.
8 / 8
प्रत्येक परंपरेमागे काही साधा सोपा अर्थ असतो. दही आणि साखर हा एक सोपा, स्वस्त आणि घरगुती उपाय आहे जो आपल्याला निरोगी ठेवण्यास मदत करतो. ज्याचे आरोग्याला अनेक फायदे होतात.
टॅग्स : आरोग्यहेल्थ टिप्स