Join us
Daily Top 2 Weekly Top 5

काजू-बदाम की अंजीर, सर्वात पौष्टिक सुकामेवा कोणता? कुणी काय खावं, काय टाळावं..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2025 08:20 IST

1 / 8
सुकामेवा रोज खा. चवीला छान असतात तसेच फार पौष्टिक असतात. शरीराला गरजेचे असणारे अनेक प्रकारचे पोषण त्यात असते. त्यामुळे आहारात सुकामेवा असायलाच हवा.
2 / 8
बदाम मेंदूची कार्यक्षमता वाढवतो आणि स्मरणशक्ती सुधारतो. त्यात जीवनसत्त्व इ असते , त्यामुळे त्वचा, केस आणि पेशी मजबूत होतात. हृदयासाठी उपयोगी हेल्दी फॅट्स आणि फायबर मिळतात. त्यामुळे बदाम नक्की खा. बुद्धीसाठी फार फायद्याचे असतात.
3 / 8
ओमेगा ३ फॅटी अॅसिड शरीराला गरजेचे असते , मात्र ते सहसा मिळत नाही. त्यासाठी आहारात अक्रोड असावेत. हृदयासाठी ते गरजेचे असते. मेंदूची कार्यक्षमता, मूड व झोप सुधारण्यास मदत होते.
4 / 8
पिस्ते प्रोटीन, फायबर आणि अँटी ऑक्सिडंट्सने समृद्ध असल्याने वजन नियंत्रित ठेवण्यास मदत करतात. रक्तातील कोलेस्टेरॉल संतुलित ठेवतात. डोळ्यांच्या आरोग्यासाठी ल्यूटिन आणि झॅन्थिन उपयुक्त ठरतात. त्यांचा पुरवठा पिस्ता करतो.
5 / 8
काजूमध्ये आयर्न, झिंक आणि मॅग्नेशियम असून ऊर्जा वाढवतो. हाडांचे आरोग्य टिकवण्यात मदत होते. त्वचा व केसांसाठी उपयुक्त हेल्दी फॅट्स मिळतात. तसेच काजू सगळ्यांना आवडतात. चार काजूतही पोट भरु शकते. पोटाला आधार मिळतो.
6 / 8
पचनासाठी उत्तम सुकामेवा म्हणजे अंजीर. बद्धकोष्टता कमी होते. तसेच हाडांसाठी उत्तम असतात. अंजीरात मोठ्या प्रमाणात कॅल्शियम असते.
7 / 8
मनुका आयर्नने समृद्ध असल्यामुळे हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी अत्यंत उपयुक्त आहेत. त्यातील नैसर्गिक साखर त्वरित ऊर्जा देते आणि शरीराला थकवा येऊ देत नाही. फायबर भरपूर असल्याने पचन सुधारते, बद्धकोष्ठता कमी होते आणि पोट शांत राहते.
8 / 8
हिवाळ्यात खायला हवा असा सुकामेवा म्हणजे खारीक. ऊर्जा देणारा नैसर्गिक आणि अत्यंत पौष्टिक स्रोत. कॅल्शियम, पोटॅशियम आणि फायबरने परिपूर्ण असतो. नक्की खा.
टॅग्स : अन्नकिचन टिप्सहेल्थ टिप्सआहार योजना