1 / 6कोणत्याही पदार्थाची चव तेव्हाच खुलते जेव्हा त्यात मीठ असतं. एखाद्यावेळी तिखटाचं प्रमाण कमी- जास्त झालं तरी चालून जातं. बिना तिखटाचं जेवणही आपण करू शकताे. पण मीठ मात्र प्रत्येक पदार्थात असायलाच हवं.2 / 6मीठ हे केवळ पदार्थाला चव देत नाही. तर त्यामध्ये असणारं आयोडीन शरीरासाठी खूप गरजेचं असतं. पण बहुसंख्य महिला पदार्थांमध्ये मीठ घालताना एक चूक करतात आणि त्यामुळे मग मिठातलं आयोडीन शरीराला पुरेशा प्रमाणात मिळत नाही.3 / 6हे टाळायचं असेल तर पदार्थामध्ये मीठ घालण्याची योग्य वेळ कोणती हे एकदा लक्षात घ्यायला हवं.4 / 6आहारतज्ज्ञ असं सांगतात की कित्येक घरांमध्ये जेव्हा भाजी फोडणीसाठी कढईत घातली जाते तेव्हा लगेचच तिच्यामध्ये मीठ घातलं जातं. किंवा भाजी वाफवून घेण्याच्या आधी त्यात मीठ घातलं जातं.5 / 6पण असं केल्याने मिठामधलं आयोडीनचं प्रमाण कमी कमी होत जातं. हे टाळायचं असेल तर मीठ घालण्याची अचूक वेळ जमायला हवी.6 / 6एक्सपर्टच्या मते जेव्हा तुम्ही केलेला पदार्थ पुर्णपणे तयार झालेला आहे, तेव्हा गॅस बंद करण्याच्या अगदी ५ ते १० मिनिटे आधी त्या पदार्थात मीठ घालावं. यामुळे आयोडीनचा पुरेपूर लाभ शरीराला मिळतो.