1 / 9ढोकळा मऊ आणि जाळीदार होण्यासाठी ढोकळ्याचं पाणी जास्त पातळ करू नका. ते पळीतून सहज पडेल असं असावं. (Right Way To Make Dhokla At Home)2 / 9पिठात आंबटपणा आणण्यासाठी ताजं दही किंवा लिंबू सत्व नक्की घाला. यामुळे सोडा सक्रिय होण्यास मदत होते. (How To Make Soft dhokla)3 / 9 पिठात थोडं तेल घातल्यानं ढोकळा घशात कोरडा लागत नाही आणि आतून मऊ राहतो.4 / 9ढोकळा मऊ आणि जाळीदार होण्यासाठी बेकींग सोडा किंवा इनो नेहमी शेवटी म्हणजे बॅटर स्टिमरमध्ये ठेवण्यापूर्वी १ मिनिट आधी घालावा.5 / 9इनो किंवा सोडा घातल्यानंतर पीठ एकाच दिशेनं फक्त १० ते १४ सेकंद फेटावे. जेणेकरून त्यात हवा भरली जाईल.6 / 9पीठ फुगून वर आले की लगेच फेटणं थांबवा. जास्त फेटल्यामुळे त्यातील हवा निघून जाईल आणि ढोकळा चपटा होईल.7 / 9 बॅटर डब्यात ओतण्यापूर्वी स्टीमरमधील पाण्यात चांगली उकळी आलेली असावी.8 / 9सुरूवातीचा १० मिनिटं ढोकळा मोठ्या आचेवर शिजवावा. जेणेकरून तो चांगला फुलतो.9 / 9ढोकळा शिजल्यानंतर त्यावर मोहोरी, कढीपत्ता आणि साखर-पाण्याची फोडणी दिसल्यास तो अधिक रसरशीत आणि स्पंजी होतो.