1 / 5कधी कधी गडबडीत स्वयंपाक करताना आपलं थोडं दुर्लक्ष होतं आणि भाजीमध्ये जरा जास्त तेल घातलं जातं.2 / 5आता जास्त तेल खाणं आरोग्यासाठी किती धोकादायक आहे हे तर आपल्याला माहितीच आहे. त्यामुळे कमीतकमी तेल खाण्याकडे आता बहुतांश लोकांचा कल असतो.3 / 5भाजीमध्ये जर तेल जास्त झालं तर त्याचा तवंग लगेच भाजीवर दिसू लागतो. हे तेल पळीमध्ये घेऊन काढताना ग्रेव्हीही वाया जाते.4 / 5म्हणूनच आता हा एक सोपा उपाय करा. भाजीतलं तेल कमी होईल. हा उपाय करण्यासाठी एका खोलगट पळीमध्ये आईस क्यूब घ्याआणि ती पळी भाजीमध्ये अलगद बुडवा. पळी थंडगार झाल्याने तिच्या तळाला भाजीतलं जास्तीचं बटर, तेल चिटकून बसेल. 5 / 5पेपट नॅपकिनचे एक टोक भाजीमधल्या तेलात अलगद बुडवा. जास्तीचं तेल पेपर नॅपकिन शोषून घेईल.