1 / 5प्रत्येक जण स्वयंपाक चांगलाच करण्याचा प्रयत्न करतो. पण तरीही कधीकधी स्वयंपाक करताना काही तरी चूक होते आणि भाजी किंवा आमटी अगदीच पातळ, पांचट होऊन जाते.2 / 5अशी पांचट आमटी, वरण किंवा भाजी कोणीही खात नाही. ती वाया जाते. म्हणूनच या काही टिप्स पाहून ठेवा. भाजी, आमटी जर गरजेपेक्षा जास्त पातळ झाली तर ती लगेचच दुरुस्त करायला या टिप्स खूप उपयोगी ठरतील.3 / 5जर तुम्ही पंजाबी स्टाईल भाजी करत असाल आणि तिची ग्रेव्ही जर खूप पातळ झाली तर कांदा आणि टोमॅटोची प्युरी करा आणि ती भाजीमध्ये घाला.4 / 5बेसनाचं पीठ पाण्यात कालवून भाजी किंवा आमटीमध्ये घातल्यानेही भाजी आळून यायला मदत होते.5 / 5शेंगदाणे आणि फुटाणे यांचा कूट पातळ झालेल्या भाजीमध्ये घाला आणि भाजी चांगली उकळून घ्या. ती छान आळून येईल.