1 / 6महाराष्ट्रात बटाटा वडा म्हणजे फारच आवडता पदार्थ. विकत कितीही वडापाव खाल्ला तरी घरी केलेल्या वड्याची मजा काही वेगळीच असते. घरोघरी बटाटा वडा करण्याची तशी सामान्य पद्धत सारखीच असली तरी त्यातही वैविध्य असते. 2 / 6साधा बटाटा वडा करताना हिरवी मिरची, लसूण, आलं अशी पेस्ट परतून ती कुस्करलेल्या बटाट्यात घालायची. मस्त मिक्स करायचे. त्याचे वडे तयार करायचे आणि मग बेसनाच्या पीठात बुडवून तळायचे. 3 / 6फोडणीत शेंगदाणे, कांदा, भरपूर कडीपत्ता घालून मग बटाट्यात घालायची. हे मिश्रण जास्त चविष्ट लागते. त्यात लाल मिरचीही घालू शकता. 4 / 6आजकाल सगळ्यात चीज घातले जाते. वडाही त्याला अपवाद नाही. मुंबईत चीज वडा फार लोकप्रिय आहे. सारणाच्या मधे चीज भरुन मग वडा तळला जातो. या रेसिपी बद्दल लोकांची मते वेगवेगळी आहेत. 5 / 6तसेच तंदूर वडा हा ही एक सध्या ट्रेंडींग प्रकार आहे. तळून झाल्यावर हा वडा दोन्ही बाजूंनी कुरकुरीत होईपर्यंत बटरवर परतायचा. हा वडा आत मऊ आणि बाहेरुन एकदम कुरकुरीत असतो. 6 / 6पुण्यात तसेच इतरही काही ठिकाणी पांढर्या भाजीचा वडा मिळतो. त्यात हळद आणि मसाले घातले जात नाहीत. त्यामुळे चवही वेगळी लागते. तसेच त्यात कोथिंबीर भरपूर घातली जाते.