Join us

तोंडात टाकताच विरघळणारे कापसाहून हलके गुलाबजाम करा घरीच! ६ टिप्स-विकतचे गुलाबजाम विसरुन जाल...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 9, 2025 18:23 IST

1 / 9
श्रावण महिन्यात उपवास आणि सणावारांची रेलचेल असते. श्रावणात विशेष (Tips & Tricks To Make Perfect Gulab Jamun At Home) करून वेगवेगळ्या प्रकारचे गोडाचे पदार्थ हे प्रत्येक घरोघरी हमखास ( how to make gulab jamun soft and juicy) तयार केले जातात. या गोडाच्या पदार्थांमध्ये गुलाबजाम तर हवेच... मऊ, लुसलुशीत, गोड पाकात भिजवलेले, जिभेवर ठेवताच विरघळणारे गुलाबजाम खाण्यासारखे दुसरे कुठले सुख नाहीच. गुलाबजाम करायला अतिशय सोपे असले तरी, अनेकजणींचा बेत काहीवेळा फसतोच.
2 / 9
गुलाबजाम कधी फुटतात, आतून कच्चे राहतात, कधी कडक होतात (Tips for Soft & Perfect Gulab Jamun) तर कधी पाक व्यवस्थित होत नाही अशा एक ना हजार भानगडी...यामुळे गुलाबजाम करताना ते नीट होतील की नाही अशी भीती आणि टेंन्शन मनात असतेच. मोठ्या हौसेनं सणावाराला गुलाबजाम केले आणि बेत फसला तर हिरमोड होतो.
3 / 9
परंतु काही साध्या - सोप्या ट्रिक्स लक्षात ठेवल्या तर गुलाबजाम(Common Gulab Jamun Mistakes and Tips for Solving Them)करणे फारसे अवघड नाही. परफेक्ट मऊ - लुसलुशीत गुलाबजाम करण्यासाठी लक्षात ठेवा...
4 / 9
सर्वातआधी पाक तयार करण्यासाठी मोठं भांडं घ्या, जेणेकरून पाकात गुलाबजाम टाकल्यावर ते एकावर एक ठेवावे लागणार नाहीत. प्रत्येक गुलाबजाम हा नीट पाकात संपूर्णपणे भिजेल आणि भांड्याच्या सपाट पृष्ठभागावर राहील याची काळजी घ्या. यासाठी ४ कप म्हणजेच साधारण एक किलो साखर आणि त्याच प्रमाणात पाणी घ्या. गुलाबजामपेक्षा पाकाचे प्रमाण जास्त असल्यास गुलाबजाम परफेक्ट होतात.
5 / 9
पाण्यांत साखर मिसळल्यानंतर चमच्याच्या मदतीने सतत हलवत राहा, जेणेकरून साखर पूर्णपणे विरघळेल. एक उकळी आल्यावर २ ते ३ मिनिटे आणखी शिजवा. गुलाबजामचा पाक हा कधीही एकतारी नसावी, फक्त चिकट आणि किंचित घट्ट असावा. पाक खूप जास्त पातळ किंवा खूप जास्त घट्ट नसावा. फक्त मधासारखा चिकटपणा असावा. यामध्ये ४ वेलदोडे, केशर आणि हवे असल्यास थोडे रोझ सिरप देखील घालू शकता. यामुळे पाकाला स्वाद आणि रंग दोन्ही उत्तम येतात.
6 / 9
२५० ग्रॅम मावा घेऊन तो चांगला मळून घ्या. इतका मळा की तो मलईसारखा मऊसर आणि गुळगुळीत झाला पाहिजे. माव्याचे कण राहता कामा नयेत, नाहीतर गुलाबजाम फुटू लागतील. सॉफ्ट गुलाबजाम बनवण्यासाठीचे सिक्रेट पदार्थ आहेत चक्का किंवा पनीर. तुम्ही यापैकी काहीही वापरू शकता. २५० ग्रॅम माव्यामध्ये १०० ग्रॅम पनीर पुरेसे आहे. आता दोन्ही छान एकत्र मळून घ्या, मावा कोरडा वाटल्यास थोडे दूध शिंपडू शकता.
7 / 9
मावा आणि पनीर मिक्स केल्यानंतर त्याला बांधण्यासाठी घट्टपणा द्यावा लागतो. हलवाई यासाठी मैदा घालतात, त्यामुळे तुम्ही १/३ कप म्हणजेच साधारण ८० ग्रॅम मैदा घालू शकता. गरजेनुसार मैदा घालत बाइंडिंग करत राहा, पण जास्त मिक्स करू नका. गुलाबजाम साठीचे पीठ मऊसर मऊसर मळून घ्या. यामध्ये अर्धा चमचा वेलचीपूड आणि केशरकाड्या सुद्धा घालू शकता.
8 / 9
गुलाबजामच्या पिठात हलवाई बेकिंग पावडरही घालतात. पीठ मळून झाल्यानंतर भांडयांवर झाकण ठेवून झाकून ५ मिनिटांसाठी ठेवून द्या. ५ ते १० मिनिटे झाकून ठेवल्यानंतर पुन्हा पीठ मळा आणि छोट्या-छोट्या आकाराचे गोळे तयार करा. तळहाताला तूप लावून हलक्या हाताने गोल फिरवा, म्हणजे कुठेही भेगा पडणार नाहीत. गुलाबजामचं पीठ पटकन सुकतं, त्यामुळे ते नेहमी झाकून ठेवावं.
9 / 9
गुलाबजाम तळताना तेल किंवा तूप हलकं गरम करून मग मंद आचेवर गुलाबजाम तळा. तेलात किंवा तुपात गुलाबजाम सोडा आणि चमच्याच्या मदतीने तेल हलवत रहा. लक्षात ठेवा, गुलाबजामवर हलकासा लेयर तयार होईपर्यंत चमचा त्याला चिकटवू नका. तुम्ही कढई हलक्या हाताने हलवू शकता, त्यामुळे गुलाबजाम तळताना एकमेकांना चिकटणार नाहीत. हलकासा सोनेरी रंग येईपर्यंत गुलाबजाम तळा. तळताना पाक हलका गरम करा आणि नंतर गुलाबजाम पाकात सोडा. थंडगार पाकात गुलाबजाम सोडू नयेत. पाक हलका गरम असला तरच तो गुलाबजाममध्ये व्यवस्थित शोषला जाऊन गुलाबजाम मऊ - लुसलुशीत होतात.
टॅग्स : अन्नकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.किचन टिप्सश्रावण स्पेशलश्रावण स्पेशल पदार्थ