वाफवूनही करता येतात या ८ भाज्या, चवीला मस्त आरोग्यासाठी चांगल्या , 'या' पद्धतीने करुन पाहा

Updated:October 19, 2025 17:35 IST2025-10-19T17:26:21+5:302025-10-19T17:35:22+5:30

These 8 vegetables tastes good just by steaming, they taste great and are good for your health, try making them this way : वाफवून करा या भाज्या. चविष्ट आणि पौष्टिक.

वाफवूनही करता येतात या ८ भाज्या, चवीला मस्त आरोग्यासाठी चांगल्या , 'या' पद्धतीने करुन पाहा

फक्त वाफवून करता येतात अशा काही भाज्या नक्की आहारात असाव्यात. त्यात तेल नाही वापरले तरी चव मस्त लागते. पाहा कोणत्या भाज्या आहेत.

वाफवूनही करता येतात या ८ भाज्या, चवीला मस्त आरोग्यासाठी चांगल्या , 'या' पद्धतीने करुन पाहा

ब्रोकली ही हिरवी भाजी पौष्टिक घटकांनी भरलेली असते. थोडे मीठ, लिंबाचा रस आणि मिरपूड घातली की वाफवलेली ब्रोकली अगदी हलकी आणि चविष्ट लागते. ती शरीरातील विषारी द्रव्ये कमी करण्यास मदत करते.

वाफवूनही करता येतात या ८ भाज्या, चवीला मस्त आरोग्यासाठी चांगल्या , 'या' पद्धतीने करुन पाहा

वाफवलेले गाजर गोडसर व मऊ लागते. त्यात बीटा कॅरोटीन असते जे डोळ्यांच्या आरोग्यासाठी फायदेशीर असते. वाफवलेले गाजर सॅलड किंवा सुपमध्येही वापरता येते.

वाफवूनही करता येतात या ८ भाज्या, चवीला मस्त आरोग्यासाठी चांगल्या , 'या' पद्धतीने करुन पाहा

तेलाशिवाय वाफवलेला पालक अतिशय पौष्टिक असतो. त्यात लोह, कॅल्शियम आणि जीवनसत्त्व ए असते. थोडे मीठ आणि लिंबाचा रस घातल्यास चव वाढते.

वाफवूनही करता येतात या ८ भाज्या, चवीला मस्त आरोग्यासाठी चांगल्या , 'या' पद्धतीने करुन पाहा

दोडके ही हलकी आणि पचायला सोपी भाजी आहे. वाफवून केली तरी चवीला फार मस्त लागते. ही भाजी शरीराला थंडावा देणारी असते.

वाफवूनही करता येतात या ८ भाज्या, चवीला मस्त आरोग्यासाठी चांगल्या , 'या' पद्धतीने करुन पाहा

वाफवलेला फ्लॉवर म्हणजे पौष्टिक आणि हलका पदार्थ. त्यात हळद आणि मीठ घालून वाफवल्यास तो पोटासाठीही चांगला आणि चविष्ट होतो.

वाफवूनही करता येतात या ८ भाज्या, चवीला मस्त आरोग्यासाठी चांगल्या , 'या' पद्धतीने करुन पाहा

वाफवलेले मक्याचे दाणे मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडतात. लिंबाचा रस आणि थोडी मिरपूड घातल्यास हे दाणे चविष्ट लागतात. ते ऊर्जा देणारे आहेत.

वाफवूनही करता येतात या ८ भाज्या, चवीला मस्त आरोग्यासाठी चांगल्या , 'या' पद्धतीने करुन पाहा

फरसबी ही भाजी वाफवून केली तरी चविष्ट लागते आणि तेलाशिवायही छानच लागते. त्यात तंतुमय पदार्थ आणि जीवनसत्वे भरपूर प्रमाणात असतात.

वाफवूनही करता येतात या ८ भाज्या, चवीला मस्त आरोग्यासाठी चांगल्या , 'या' पद्धतीने करुन पाहा

रताळं वाफवून खाल्ले की त्याचा गोडवा वाढतो. उपवासालाही खाता येते. हे पोटभरणारे आणि ऊर्जा देणारे अन्न आहे.रताळ्याची दह्यातली भाजी करता येते. ती ही पौष्टिक आणि चविष्ट असते.