मक्याचे दाणे २ मिनिटांत निघतील; १ ट्रिक वापरा; दाणे काढण्याचं किचकट काम होईल सोपं
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2024 20:22 IST
1 / 7पावसाळ्याच्या दिवसांत मक्याचे सेवन मोठ्या प्रमाणात केले जाते. बाजारात ताजे मके दिसायला सुरूवात होते. मक्याचे दाणे काढणं कठीण काम वाटतं. कारण मक्याचा कणीस भाजून खायचा असेल तर ठीक आहे पण भाजून खायचा नसेल तर दाणे काढून उकळवावे लागतात तर काहीजण भाजीत, सॅलेड, सॅण्डविचमध्ये हे दाणे घालतात. मक्याचे दाणे काढून टाकण्यासाठी तुम्ही काही सोप्या ट्रिक्सचा वापर करू शकता. 2 / 7मक्याचे दाणे तुम्ही सुरीने कापून काढून टाकू शकता. सगळ्यात आधी दाणे इकडे तिकडे पसरण्यापासून रोखा. ही सर्वात चांगली पद्धत आहे. तुम्ही मक्याचे दाणे एका मोठ्या भांड्यात काढून घ्या. मक्याचे दाणे काढण्यासाठी तुम्ही टोकदार साहित्य किंवा सुरीचा वापर करू शकता. 3 / 7मक्याला उलटे करून एका वाटीवर ठेवा. त्यानंतर एका धार असलेल्या सुरीचा वापर करून मक्याचे दाणे काढून घ्या. खालच्या बाजूंनी कापा जितकं शक्य होईल इतकं दोन्ही दाणे फिरवा. त्यानंतर कापून पुन्हा दाणे काढून घ्या. 4 / 7मक्याचा कणीस पूर्ण उकळवून नंतरही तुम्ही याचे दाणे काढू शकता. या उपायामुळे दाणे काढून टाकणं सोपं होईल. हे दाणे तुम्ही कोणत्याही रेसिपीत वापरू शकता.5 / 7 तुमच्याकडे भाजीचा ब्रश असेल तर तुम्ही या ब्रशच्या साहाय्याने रेशम काढून टाका. हे साफ करण्याासठी तुम्ही टुथब्रशचा वापर करू शकता. एकाच दिशेने ब्रश करा ज्यामुळे रेशम सहज निघून जाण्यास मदत होईल. 6 / 7मक्याच्या कणीसाचे देठ पकडून 30 ते 60 सेकंदांसाठी मायक्रोव्हेव्ह करा. मक्याचे देठ गरम झाले की ते बाहेर काढा. मका बाहेर काढल्यानंतर व्यवस्थित भाजून घ्या. 7 / 7(Image Credit- Social Media)