Join us
Daily Top 2 Weekly Top 5

एक कप स्पेशल चाय और बाते!! सांगा तुम्ही कसा चहा पिता? कडक आवडतो की लिंबू मारके? प्रकार अनेक पण प्रेम एकच ...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2025 15:00 IST

1 / 6
चहा प्यायल्याने काय होईल काय नाही हे सारे ऐकून - वाचून झाल्यावरही हातात चहाचा कप घेतल्याशिवाय राहवत नाही. चहा हा आयुष्याचा तसा अविभाज्य भागच झाला आहे. सकाळची सुरवात ते मित्रांशी गप्पा सगळ्या घटनांची नोंद चहाचा कप घेत असतो.
2 / 6
चहाचे ही प्रकार असतातच. विविध राज्यांमध्ये विविध प्रकारे चहा केला जातो. तसेच चहाप्रेमी सगळे प्रकार आवडीने पितात. तरतरी आणि उत्साह येण्यासाठी चहा हवाच. चहाला व्यसन म्हटले जाते, त्यात काहीच वावगं नाही. दिवसातून दोनदा चहा प्यायल्याशिवाय दिवस पूर्ण झाल्यासारखा वाटतच नाही.
3 / 6
चहाचा सर्वात पारंपरिक प्रकार म्हणजे काळा चहा. भारतात सकाळची सुरुवात अनेक घरांत याच चहाने होते. चहापूडचे पूर्ण ऑक्सिडेशन झाल्यामुळे त्याचा रंग गडद आणि चव कडक होते. मजेदार गोष्ट म्हणजे दूध न घातलेला काळा चहा जगभर जास्त प्रमाणात प्यायला जातो, तर भारतात मात्र दूध-साखरेसह तो लोकप्रिय आहे.
4 / 6
हिरवा चहा हा आरोग्याच्या दृष्टीने ओळखला जातो. तो फारसा उकळला जात नाही, त्यामुळे त्यातील नैसर्गिक घटक टिकून राहतात. जपान आणि चीनमध्ये हिरवा चहा पिणे म्हणजे एक छोटासा विधीच असतो. इतर देशांत असा चहा तर ध्यानधारणेपूर्वी प्यायचा असा नियम आहे, कारण तो मन शांत करतो.
5 / 6
मसाला चहा हा भारतातला खास. आलं, दालचिनी, लवंग, वेलची अशा मसाल्यांमुळे हा चहा फक्त चवदारच नाही तर शरीराला उब देणारा ठरतो. गंमत म्हणजे प्रत्येक घराचा मसाला चहा वेगळा असतो, घरोघरी चव वेगळी असते. कोण आलं जास्त घालते तर कोणाला सुंठ आवडते.
6 / 6
लेमन टी म्हणजे हलका आणि ताजेतवाने करणारा चहाचा प्रकार. उन्हाळ्यात हा चहा विशेष आवडीने प्यायला जातो. लेमन टी म्हणा किंवा कालापानी इतरही काही नावे असतील , हा चहा सगळीकडे टपरीवरही मिळतो. लोकं आवडीने पितात. त्यात पुदिना आणि तुळसही घातली जाते.
टॅग्स : अन्नपाककृतीकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.किचन टिप्ससोशल व्हायरल