1 / 7करमर हे एक फार लोकप्रिय फळ आहे. या फळाचे सगळ्यांना माहिती असलेले नाव म्हणजे स्टार फ्रुट. छान आंबट गोड असे हे फळ फार छान लागते. 2 / 7मात्र करमरं खाण्याचे काही आरोग्यदायी फायदेही आहेत. फक्त चवीसाठीच करमरं खाऊ नका. पाहा किती फायद्याचे आहे हे फळ.3 / 7स्टार फ्रुटमध्ये जीवनसत्त्व 'सी' भरपूर प्रमाणात असते. प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी त्याचा फायदा होतो. त्यामुळे त्वचाही चांगली राहते. 4 / 7करमरात फ्लावोनॉइड्स नावाचे अँण्टीऑक्सिडंट्स असतात. या गुणधर्मामुळे हाता पायाची सुज कमी होते. मेंदूसाठी फार गरजेचे असते. 5 / 7पचनासाठी हे फळ फायद्याचे ठरते. फायबर असल्यामुळे पचनक्रिया सुरळीत होते. पोट छान राहते. 6 / 7कमी कॅलरीज, जास्त फायबर आणि पाण्याचं प्रमाण यामुळे हे फळ वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी मदत करते. 7 / 7करमरात सुमारे ९० % पाणीच असते. त्यामुळे हायड्रेशनसाठी हे फळ अगदीच चांगले आहे. शरीरातील पाण्याची पातळी सुरळीत राहते.