Join us

वाफवलेलं की उकडलेलं... कोणतं अन्न आरोग्यासाठी जास्त चांगलं? फायदे समजल्यावर तुम्हीही खाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2025 14:50 IST

1 / 9
आजकाल लोक निरोगी खाण्याकडे वळत आहेत. लोक तळलेल्या पदार्थांऐवजी वाफवलेलं आणि उकडलेलं अन्न खाण्यास प्राधान्य देत आहेत. पण प्रश्न असा आहे की, या दोघांपैकी आरोग्यासाठी जास्त फायदेशीर काय आहे? तज्ज्ञांकडूनच जाणून घेऊया याचं उत्तर.
2 / 9
शरीर निरोगी ठेवण्यासाठी आहारात वाफवलेल्या किंवा उकडलेल्या पदार्थांचा समावेश करण्याचा सल्ला नेहमीच दिला जातो. या दोन्ही पद्धती अन्नाची क्वालिटी आणि न्यूट्रिशन राखण्यास मदत करतात.
3 / 9
यासाठी लोक अनेकदा भाज्या अशाप्रकारे खाण्यास सुरुवात करतात. काही भाज्या उकडून खातात, तर काही वाफवून खातात.
4 / 9
वाफवून अन्न शिजवल्याने त्यातील न्यूट्रिशन तसंच राहतं, ज्यामुळे आरोग्याला अनेक फायदे होतात. काही लोकांना वाफलेलेच पदार्थ आवडतात.
5 / 9
वाफवून खाल्ल्यामुळे आपलं पचन सुधारतं. कोलेस्ट्रॉलची पातळी टिकून राहते आणि ते मधुमेहाच्या रुग्णांसाठी देखील अत्यंत फायदेशीर आहे.
6 / 9
जर तुम्ही अन्न उकडून खाल्लं तर ते देखील फायदेशीर आहे. पण दोघांपैकी काय आरोग्यासाठी सर्वात चांगलं याची माहिती डॉ. गीतिका चोप्रा यांनी दिली. वाफवलेलं अन्न अधिक फायदेशीर ठरू शकतं असं म्हटलं आहे.
7 / 9
डॉ. गीतिका चोप्रायांनी दिलेल्या माहितीनुसार, भाज्या वाफेवर शिजवल्याने त्यातील जीवनसत्त्वं आणि मिनरल्स कमी होत नाहीत.
8 / 9
जर भाज्या उकडून घेतल्या तर त्यातील व्हिटॅमिन्स पाण्यामध्ये निघून जातात. विशेषतः व्हिटॅमिन सी, बी-कॉम्प्लेक्स आणि एंजाइम्स.
9 / 9
जर आपल्याला वजन कमी करायचं असेल किंवा रोगप्रतिकारक शक्ती वाढवायची असेल आणि चांगली त्वचा हवी असेल तर वाफवलेले पदार्थ नक्की खा.
टॅग्स : अन्नआरोग्यहेल्थ टिप्स