Join us
Daily Top 2 Weekly Top 5

टोपलीभर लसूण झटपट सोलण्याच्या ७ ट्रिक्स, काम होईल सोपं आणि चटकन

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2025 19:38 IST

1 / 7
लसूण सोलण्याचं अवघड काम सोपं करण्यासाठी काही ट्रिक्स तुम्हाला कामात येतील. लसणाच्या पाकळ्या ५ ते १० मिनिटं गरम पाण्यात भिजवा. साली आपोआप निघतील आणि लगेच निघतील. (How To Peel Garlic Quickly)
2 / 7
प्रत्येक पाकळीवर चाकूच्या सपाट भागाचा वापर करून हलका दाब द्या. ज्यामुळे सालं निघतात आणि के काढणं सोपं होतं. (Easy ways To Peel Garlic)
3 / 7
लसणाच्या पाकळ्या वेगळ्या करून झाकण असलेल्या डब्यात घाला. हा डबा २० ते ३० सेकंद जोरात हलवा, साली सुटून जाण्यात मदत होईल.
4 / 7
लसणाच्या पाकळ्या १० ते १५ सेकंदांसाठी मायक्रोव्हेव्हमध्ये गरम करा. उष्णतेमुळे साली लगेच सैल होतात.
5 / 7
लसणाच्या पाकळ्या एका स्टिलच्या ग्लासमध्ये वाटीत घ्या. त्यावर दुसरा स्टिलचा ग्लास उलटा झाकून दोन्ही एका हातात पकडा आणि जोरात हलवा. दोन्ही भांड्यांच्या घर्षणानं साली पटकन वेगळ्या होतील.
6 / 7
पाकळ्या १५ मिनिटं फ्रिजरमध्ये ठेवा. थंडीमुळे साली कडक होऊन सहज निघतील. या ट्रिक्स वापरून तुम्ही कमी वेळेत जास्त लसूण सोलू शकता.
7 / 7
लसूण सोलण्यापूर्वी त्याला रबर मॅटवर किंवा सिलिकॉन मॅटवर थोडा वेळ रगडा. रबरच्या पृष्ठभागामुळे साली सैल होण्यास मदत होते.
टॅग्स : अन्नकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.किचन टिप्स