Join us
Daily Top 2 Weekly Top 5

मेसमध्ये मिळते तशी टम्म फुगणारी, लुसलुशीत चपाती करण्याची ट्रिक! २ दिवस मऊ राहील चपाती

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2026 15:17 IST

1 / 10
मेसमध्ये मिळते तशी मऊ आणि भरपूर पदर सुटणारी चपाती करण्यासाठी पीठ मळण्यापासून ते शेकण्यापर्यंत काही ट्रिक्स फॉलो कराव्या लागतील. (How To Make Soft Chapati At Home)
2 / 10
पीठ मळताना त्यात थोडं गरम तेल आणि मीठ घाला तसंच पीठ भिजवण्यासाठी कोमट पाण्याचा किंवा दुधाचा वापर केल्यास चपाती बराचवेळ मऊ राहते. (Special Trick To Super Soft Roti)
3 / 10
पीठ खूप घट्ट मळू नका. पीठ मळून झाल्यावर त्याला वरून थोडं तेल लावून किमान २० ते ३० मिनिटं झाकून मुरू द्या.
4 / 10
चपातीला भरपूर पदर येण्यासाठी गोळ्याची छोटी पुरी लाटून तेल आणि कोरडं पाणी लावून त्रिकोणी किवा चौकोनी घडी घाला.
5 / 10
घडी घातल्यानंतर चपाती लाटताना कडांकडून मधल्या बाजूला समान दाब देऊन लाटावी ज्यामुळे ती व्यवस्थित फुगते.
6 / 10
चपाती नेहमी मध्यम ते उच्च आचेवर शेकावी. मंद आचेवर चपाती शेकल्यास ती वातड किंवा कडक होते.
7 / 10
तव्यावर टाकल्यानंतर चपातीला छोटे बुडबुडे आले की लगेच उलटावी आणि दुसऱ्या बाजूनं चांगली शेकल्यानंतर तेल किंवा तूप लावावे.
8 / 10
चपाती डब्यात ठेवताना कापडी रूमाल किंवा पेपर नॅपकिन ठेवा. ज्यामुळे वाफेच्या पाण्यानं चपाती खालून ओली होत नाही.
9 / 10
चपाती पूर्ण गार झाल्यावरच एअरटाईट डब्यात भरून ठेवावी. यामुळे ती दुसऱ्या दिवशीही मऊ, लुसलुशीत राहते.
10 / 10
अशा पद्धतीनं केलेल्या चपात्या १ ते २ दिवस सहज मऊ राहतात. चपात्या ताज्या पिठाच्या असतील तरच त्यात जास्तवेळ मऊ आणि ताज्या राहतात.
टॅग्स : कुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.किचन टिप्स