Join us
Daily Top 2 Weekly Top 5

तेल न वापरता कुकरमध्ये पुऱ्या करण्याची व्हायरल ट्रिक, खरंच बिनतेलाच्या पुऱ्या फुगतात का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2026 13:01 IST

1 / 8
गरमागरम पुरीचं नाव ऐकताच तोंडाला पाणी सुटतं. लहान मुलं असो की वयस्कर लोक प्रत्येकालाच पुऱ्या खायला आवडतात. पण सतत जास्त तेलात तळलेल्या पुऱ्या खाल्ल्यानं तब्येतीचं बरंच नुकसान होऊ शकतं. (How To Make Oil Free Puri In Cooker)
2 / 8
घरच्याघरी कुकरमध्ये तुम्ही कमीत तमी तेलात पुऱ्या तळू शकता. कुकरमध्ये पुऱ्या करण्याची ट्रिक सध्या सोशल मीडियात व्हायरल आहे.
3 / 8
कुकरमध्ये पुरी करण्यासाठी १ कप गव्हाचं पीठ, चवीनुसार मीठ, एक छोटा चमचा ओवा आणि कोमट पाणी लागेल.
4 / 8
सगळ्यात आधी एक भांड घ्या. त्यात मीठ आणि ओवा मिसळा. नंतर त्यात थोडं थोडं पाणी मिसळून घट्ट पीठ मळून घ्या.
5 / 8
पीठ मळल्यानंतर १० ते १५ मिनिटांसाठी झाकून ठेवा. जेणेकरून पीठ व्यवस्थित सेट होईल आणि पुऱ्या व्यवस्थित होतील.
6 / 8
पिठाचे छोटे छोटे गोळे तयार करून पुरी लाटून घ्या. नंतर कुकर घ्या त्यात १ ते २ ग्लास पाणी घाला नंतर कुकरचा स्टॅण्ड आत ठेवा. त्यानंतर कुकरमध्ये सहज बसेल अशी प्लेट ठेवा आणि तेल लावून घ्या.
7 / 8
नंतर प्लेटमध्ये पुऱ्या ठेवून कुकरमध्ये घाला. शिट्टी घ्यायची नाही. उच्च आचेवर ३ ते ४ मिनिटं शिजू द्या. वाफेवर पुऱ्या व्यवस्थित शिजतील.
8 / 8
या पद्धतीनं तुम्ही झटपट कुकरमध्ये पुऱ्या करू शकता. फार मेहनत न घेतात कमी वेळात पुऱ्या होतील.
टॅग्स : कुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.किचन टिप्सअन्न