Join us
Daily Top 2 Weekly Top 5

इंदौरचे पोहे म्हणजे सुख, पाहा इंदुरी पोहे करण्याची पारंपरिक रेसिपी, ८ टिप्स-पोहे होतील परफेक्ट चवीचे

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2026 18:07 IST

1 / 8
इंदोरी पोहे म्हणजे चवीचा आणि मऊपणाचा एक उत्तम मेळ. अगदी हॉटेलसारखे मऊ आणि चविष्ट पोहे घरीच करण्यासाठी काही महत्वाच्या टिप्स पाहूया. (Indoori Poha Recipe How To Make Indoori Poha)
2 / 8
इंदोरी पोह्यांसाठी नेहमी जाड पोहे वापरावेत. पोहे २ ते ३ वेळा स्वच्छ धुवून घ्या आणि त्यातील पाणी पूर्णपणे निथळून साधारण १० ते १५ मिनिटं तसंच ठेवा. जेणेकरून ते छान फुलतील. (Special recipe for making Indori Poha)
3 / 8
पोहे भिजवल्यानंतर फोडणी देण्यापूर्वीच त्याच चवीनुसार साखर आणि मीठ घालून हलक्या हातानं एकजीव करा. यामुळे पोह्यांना एकसमान चव येते.
4 / 8
इंदोरी पोह्यांचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे ते तेलात जास्त परतण्याऐवजी वाफेवर शिजवले जातात. कढईत पाणी गरम करून त्यावर चाळणी ठेवून किंवा मंद आचेवर झाकण ठेवून ५ ते ७ मिनिटं पोहे वाफवून घ्या.
5 / 8
फोडणीत मोहोरी, कढीपत्ता, हिरवी मिरची आणि मुख्य म्हणजे बडीशेप नक्की घाला. बडीशेपेमुळे इंदोरी पोह्यांना खास सुगंध येतो.
6 / 8
पोहे प्लेटमध्ये काढल्यावर त्यावर जीरं मसाला, बारीक चिरलेला कांदा, कोथिंबीर आणि भरपूर बारीक शेव घालून सर्व्ह करा.
7 / 8
सर्व्ह करण्यापूर्वी वरून थोडा लिंबाचा रस घातल्यानं चव अधिक खुलते.
8 / 8
पोहे परतवून झाल्यानंतर तुम्ही त्यावर खोबरं किसून घालू शकता. ज्यामुळे पोह्यांना वेगळीच छान चव येते.
टॅग्स : अन्नकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.किचन टिप्स