Join us
Daily Top 2 Weekly Top 5

अण्णाच्या हॉटेलमध्ये मिळते तशी पांढरीशुभ्र चटणी करण्यासाठी ८ टिप्स, नारळ न घालताही येईल चव

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2026 19:56 IST

1 / 8
साऊथ इंडियन हॉटेलमध्ये मिळते तशी पांढरीशुभ्र क्रिमी आणि चविष्ट फुटाण्याच्या डाळीची चटणी घरी करण्यासाठी तुम्हाला काही सोप्या टिप्स फॉलो कराव्या लागतील. (South Style white Chutney)
2 / 8
चटणीसाठी फुटण्याची डाळ आणि ओलं खोबरं यांचं प्रमाण योग्य असणं गरजेचं आहे. हॉटेलसारखी चव हवी असल्यास तुम्ही १ वाटी ओल्या खोबऱ्यासाठी अर्धी वाटी फुटाण्याची डाळ वापरू शकता. यामुळे चटणीला दाटसरपणा येतो. (South Indian Hotel Style White Chutney Recipe)
3 / 8
जर तुम्हाला चटणी हॉटेलसारखी वी असेल तर तुम्ही यात ओल्या खोबऱ्याची मागची काळी साल काढून त्यात घालू शकता.
4 / 8
चटणीत आल्याचा एक छोटा तुकडा आणि लसणाच्या १ ते २ पाकळ्या नक्की घाला. यामुळे चटणीला एक विशिष्ट खमंगपणा येतो. मात्र लसूण जास्त घालू नका नाहीतर वास उग्र येईल.
5 / 8
चटणीला हलका आंबटपणा येण्यासाठी चिंचेचा एक छोटा तुकडा किंवा १ चमचा ताजं दही घाला. यामुळे अधिक चांगली चव येईल.
6 / 8
चटणी वाटताना नेहमी थंड पाण्याचा वापर करा. मिक्सर फिरवताना गरम होतो. ज्यामुळे चटणीला तेल सुटू शकते किंवा रंग बदलू शकतो. थंड पाण्यामुळे चटणीचा ताजेपणा टिकून राहतो.
7 / 8
आधी डाळ, खोबरं, आलं आणि मीठ हे सर्व कोरडे किंवा अगदी थोडं पाणी घालून वाटून घ्या. एकदा बारीक पेस्ट झाली की मग हवंतसं पाणी घालून पुन्हा फिरवून घ्या. यामुळे चटणीत डाळीचे कण राहत नाहीत. फोडणीसाठी खोबरेल तेल किंवा शेंगदाणा तेल वापरा. तेल कडकडीत गरम झाल्यावर त्यात मोहरी, उडदाची डाळ, कढीपत्ता, सुकी लाल मिरची घाला.
8 / 8
चटणी वाटताना त्यात पाव चमचा साखर घाला. साखर चटणीचा रंग हिरवा-पांढरा टिकवून ठेवण्यास आणि सर्व चवींना बॅलेन्स करण्यास मदत करते. फोडणीत उडीदाची डाळ नक्की घाला. चटणी खाताना जेव्हा ही डाळ दातांखाली येते तेव्हा ती खूपच छान लागते.
टॅग्स : अन्नकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.किचन टिप्स