Join us
Daily Top 2 Weekly Top 5

अण्णाच्या गाडीवर विकतात तशा छोट्या-मऊ इडल्या करण्याच्या ८ ट्रिक्स; हलकी-जाळीदार होईल इडली

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2026 19:35 IST

1 / 8
हॉटेलमध्ये मिळतात तशा पांढऱ्याशुभ्र इडल्या घरी करण्यासाठी तुम्हाला काही खास हटके टिप्स वापरता येतील. नेहमीच्या टिप्सपेक्षा या थोड्या वेगळ्या टिप्स आहेत ज्याचा उत्तम परिणाम दिसून येईल. (Soft Idli Making 8 Tricks)
2 / 8
नेहमीप्रमाणे ३ वाटी तांदळाला १ वाटी डाळ घेण्यापेक्षा अडीच वाटी जाडा तांदूळ आणि १ अख्खी वाटी उडीद डाळ घ्या. ( How To Make Hotel Style Soft Perfect Idli At Home)
3 / 8
पीठ दळताना त्यात अर्धी वाटी भिजवलेले साबुदाणे आणि पाव वाटी भिजवलेले पातळ पोहे घाला. साबुदाण्यांमुळे इडलीचा एक प्रकारचा मऊपणा येतो आणि कापसारखी मऊसूत होते.
4 / 8
डाळ तांदूळ नेहमी वेगवेगळे भिजत घाला. उडीद डाळ धुताना ती जास्त चोळून धुवू नका. कारण त्यातील नैसर्गिक यीस्ट निघून गेल्यास पीट नीट फुगत नाही.
5 / 8
मेथी दाणे घातलेले पाणी फेकून न देता पीठ दळताना तेच पाणी वापरा. मेथी दाण्यांमुळे किण्वन प्रक्रिया वेगवान होते आणि इडलीला छान सुवास येतो.
6 / 8
मिक्सरमध्ये पीठ दळताना मिक्सर गरम होतो ज्यामुळे पिठातील बॅक्टेरिया मरू शकतात. हे टाळण्यासाटी गार पाणी किंवा बर्फाचे तुकडे वापरा यामुळे पीठ थंड राहते आणि इडल्या पांढऱ्याशुभ्र होतात.
7 / 8
पीठ दळल्यानंतर त्यात मीठ घालून ते ५ मिनिटं किमान एकाच दिशेनं फिरवा. हाताच्या उष्णतेमुळे पिठात लवकर हवा भरली जाते आणि आंबवण्याची प्रक्रिया सुधारते.
8 / 8
इडली पात्र गॅसवर ठेवण्यापूर्वी पाणी चांगले उकळवून वाफ येऊ द्या. थंड पाण्यात इडली पात्र ठेवू नका. सुरूवातीच ३ मिनिटं मोठी फ्लेम आणि नंतरची १० मिनिटं मध्यम फ्लेमवर इडली शिजवा.
टॅग्स : अन्नकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.किचन टिप्स