1 / 8श्रावण म्हणजे विविध अन्न पदार्थांचा महिना. चहूकडे हिरवळ तर असतेच मात्र घराघरातून खमंग पदार्थांचा वास दरवळत असतो. आपसूकच खिडकीतून आपण शेजार्यांना आज काय स्पेशल विचारतो. मग तिकडूनही उत्तर येतं डबा पाठवतेय. सांगा कसं झालं आहे. 2 / 8फक्त नैवेद्यासाठीच नाही तर जिभेचे चोचले पुरवण्यासाठीही श्रावणात पदार्थांची चंगळ असते. विविध चवींचे पदार्थ केले जातात. ठराविक पदार्थांमध्ये आणि काही नियम पाळूनही स्वादिष्ट जेवण करता येतं. हे भारतीय पदार्थांच्या रेसिपी कायम सिद्ध करतात. 3 / 8श्रावणात गोड पदार्थ तर घरोघरी केले जातात. श्रावणी सोमवारी काहीतरी छान पदार्थ करायची इच्छा असतेच. सगळ्या सोमवारी वैविध्यपूर्ण पदार्थ करा. आपले नेहमीचेच पदार्थ जरा ट्विस्ट देऊन करायचे. त्याची चव आणखी छान तसेच भन्नाट लागते. 4 / 8जसं की गुलाबजाम. हा पदार्थ माहिती नाही असे कोणच नसेल. पण विविध प्रकारे गुलाबजाम करता येतो. गुलाबजामसाठी गोळे वळताना त्यात सुकामेवा बारीक करुन भरायचा. तसेच काही जण अख्खा काजू , बदामही भरतात. असा स्टफ गुलाबजाम एकदम मस्त लागतो. 5 / 8मालपुआ हा पदार्थ करायला अगदी सोपा आहे. अस्सल साजूक तुपातला मालपुआ एकदा खाल्ला तर मन तृप्त होईल. नैवेद्यासाठी एखाद्या सोमवारी हा पदार्थ नक्की करा. 6 / 8जर तुम्हाला कामातून किंवा इतर कोणत्या कारणामुळे दर सोमवारी काही वेगळी करण्यासाठी वेळ मिळत नाही, तर घरी लाडू करुन ठेवायचे. एकदाच काय ते वळायचे कष्ट. बाकी खराब होत नाहीत. बरेच दिवस टिकतात. खास तुपातले कणकेचे लाडू करु शकता. तसेच इतरही अनेक प्रकार असतात. 7 / 8कोणताही उत्सव असो. खीर एकदा तरी केली जातेच. मग शेवयांची खीर करा, रव्याची करा, गव्हाची करा. तसेच तांदळाचीही करु शकता. खीर झटपट होते आणि खीर असेल तर भाजी नाही केली तरी चालतं. ताजं दूध असेल तर कोणत्याही पदार्थाची झटपट खीर करता येते. 8 / 8श्रावणात किनारपट्टी जवळच्या गावांमध्ये नारळाचे पदार्थ करतात. नारळाची खीर, नारळी भात. तसेच गोड पोळी आणि इतरही काही केले जातात. छान चविष्ट असे ताज्या नारळाचे पदार्थ केले जातात. तुम्हीही नक्की करुन पाहा.