श्रावणात बिना कांदा लसणाच्या भाज्यांना चविष्ट करणारे ६ पदार्थ, वाटण करण्याची पाहा खास रीत

Updated:July 24, 2025 16:44 IST2025-07-24T16:37:25+5:302025-07-24T16:44:33+5:30

Shravan Special : 6 foods will make curry taste good, no onion no garlic, Shravan food : श्रावणात करा चविष्ट भाजी. कांदा लसूण आहे का नाही हे कळणारही नाही. पाहा कोणते पदार्थ वापराल. आमटी आणि भाजीची चव वाढवणारे पदार्थ.

श्रावणात बिना कांदा लसणाच्या भाज्यांना चविष्ट करणारे ६ पदार्थ, वाटण करण्याची पाहा खास रीत

श्रावण महिना म्हणजे सणांचा महिना. तसेच श्रावणामध्ये अनेक नियम पाळले जातात. आजकाल सगळेच नियम पाळले जात नाहीत. आधीसारखे घरोघरी श्रावण पाळला जात नाही. मात्र काही जण आजही काही नियम पाळतात.

श्रावणात बिना कांदा लसणाच्या भाज्यांना चविष्ट करणारे ६ पदार्थ, वाटण करण्याची पाहा खास रीत

एकदा का श्रावण संपला की लोकं कांद्यावर तुटून पडतात. मात्र महिनाभर कांदा - लसूण घरातही आणत नाहीत. लसूण, कांद्याशिवाय भाजीला आणि आमटीला चव येऊ शकते का? त्याचे उत्तर नक्कीच हो असे आहे.

श्रावणात बिना कांदा लसणाच्या भाज्यांना चविष्ट करणारे ६ पदार्थ, वाटण करण्याची पाहा खास रीत

कांद्याऐवजी हे काही पदार्थ आहेत जे भाजीत तसेच आमटीत घालता येतात. ज्यामुळे भाजीची चव एकदम मस्त लागते. मुळमुळीत तर अजिबात लागत नाही. जेवणात कांदा आणि लसूण असायलाच हवे हा अट्टाहास सोडायला लावणाऱ्या चवी पाहा.

श्रावणात बिना कांदा लसणाच्या भाज्यांना चविष्ट करणारे ६ पदार्थ, वाटण करण्याची पाहा खास रीत

नारळ काही ठराविक भाजीत घातला जातो. ताज्या नारळाचे वाटण लावून केलेल्या भाज्या एकदम जबरदस्त लागतात. त्यात कोथिंबीर, आलं, जिरं असे पदार्थ घालता येतात. आमटीतही नारळ घातला जातो. छान परतून घ्यायचा. चवीला मस्तच.

श्रावणात बिना कांदा लसणाच्या भाज्यांना चविष्ट करणारे ६ पदार्थ, वाटण करण्याची पाहा खास रीत

टोमॅटो हा पदार्थ कांद्यासोबत वापरला जातो. भाजीत कांदा टोमॅटो घाला असे आपणही अनेकदा म्हणतो. मात्र फक्त हिरवी मिरची आणि टोमॅटो घालूनही भाजी छान चविष्ट करता येते. टोमॅटोचे सार, आमटी करता येते.

श्रावणात बिना कांदा लसणाच्या भाज्यांना चविष्ट करणारे ६ पदार्थ, वाटण करण्याची पाहा खास रीत

सिमला मिरचीची भाजी केली जाते. मात्र सिमला मिरची परतून तिचे वाटणही करता येते. हे वाटण चवीला एकदम मस्त असते. परतलेली सिमला मिरची चवीला वेगळीच असते. त्यात जर भिजवलेले काजू घालून पेस्ट तयार केली तर फारच चविष्ट पदार्थ तयार होतो.

श्रावणात बिना कांदा लसणाच्या भाज्यांना चविष्ट करणारे ६ पदार्थ, वाटण करण्याची पाहा खास रीत

नारळ आणि खोबरं या दोन्ही पदार्थांना अनेक जण एकसमानच मानतात. मात्र तसे नसून खोबरं चवीला फार वेगळं असतं. सुकी भाजी करताना त्याला खोबऱ्याचे वाटण लावायचे. एकदम छान लागते. भाजीला एक स्मोकी चव येते.

श्रावणात बिना कांदा लसणाच्या भाज्यांना चविष्ट करणारे ६ पदार्थ, वाटण करण्याची पाहा खास रीत

काही ठराविक ग्रेवीवाल्या भाज्या करताना त्यात दही घालता येते. दही घालून केलेली भाजी चवीला एकदम मस्त लागते. मात्र सगळ्याच भाज्यांत दही चांगले लागत नाही. बटाटा, सिमला मिरची, टोमॅटो यांची दह्यातली भाजी करता येते.

श्रावणात बिना कांदा लसणाच्या भाज्यांना चविष्ट करणारे ६ पदार्थ, वाटण करण्याची पाहा खास रीत

गवार, भेंडी, फरसबी यासारख्या भाज्या परतायच्या. त्यात मसाले घालायचे आणि छान दाण्याचे कुट घालायचे. दाण्याच्या कुटामुळे भाजीला एक वेगळीच चव येते. या भाज्या करायलाही अगदी सोप्या असतात.