1 / 7उन्हाळ्यातला एक उत्तम आहार म्हणजे सातूचं पीठ (sattu ka atta recipe). सातूचं पीठ हा आपल्याकडचा एक पारंपरिक पदार्थ आणि तो खासकरून उन्हाळ्यात खाल्ला जातो.(how to make satuche pith)2 / 7सातूचं पीठ उन्हाळ्यात खाल्ल्यामुळे शरीर थंड राहण्यास मदत होते असं म्हणतात. शिवाय अंगात उर्जाही टिकून राहाते. उन्हाळ्यात बऱ्याचदा काहीही खाण्याची इच्छा होत नाही. अशावेळी थोडंसं सातूचं पीठ दुधात किंवा पाण्यात कालवून खाल्लं तरी चालतं. अशक्तपणा जाणवत नाही.(Summer Special Recipe of Satuche Pith)3 / 7सायंकाळच्या वेळी थोडीशी भूक लागते. ही भूक भागविण्यासाठी काहीतरी पौष्टिक हवंच असतं. अशावेळी सातूचं पीठ हा एक उत्तम पर्याय असू शकतो. अगदी ८- १० महिन्यांच्या बाळापासून ते वयस्कर व्यक्तींपर्यंत कोणालाही सातूचं पीठ चालतं.4 / 7वेटलॉस करणाऱ्या मंडळींसाठी आणि मधुमेह असणाऱ्या लोकांसाठीही सातूचं पीठ हा एक उत्तम आहार आहे. असं हे बहुगुणी सातूचं पीठ घरच्याघरी कसं करायचं ते पाहूया.. 5 / 7सातूचं पीठ करण्यासाठी २ वाट्या गहू आणि १ वाटी हरबऱ्याची डाळ घ्या. हे दोन्ही स्वच्छ धुवा आणि नंतर एका कापडावर पसरवून पंख्याखाली ठेवून एखादा तास सुकवून घ्या. त्यानंतर गहू आणि डाळ दोन्ही एकत्रितपणे कढईत मंद आचेवर भाजून घ्या.6 / 7त्यानंतर १ चमचा जिरेही भाजून घ्या. गहू, हरबरा डाळ आणि जिरे थंड झाल्यानंतर एकत्रितपणे मिक्सरमध्ये घाला किंवा गिरणीत दळायला द्या. 7 / 7त्यामध्ये २ टीस्पून सुंठ आणि १ टीस्पून वेलची पावडरही घाला सातूचे पीठ आणखी जास्त पौष्टिक आणि चवदार होईल. हे पीठ एका भांड्यात घ्यावे. त्यात दूध किंवा पाणी घालवून कालवावे. चवीनुसार साखर किंवा गूळ घालावा. अतिशय चविष्ट लागते. ट्राय करून पाहा.