By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2026 16:41 IST
1 / 8चपातीला तूप लावून खाणं ही आपल्याकडची एक जुनी आणि आरोग्यदायी परंपरा आहे. यामागची शास्त्रीय आणि व्यावहारीक कारणं पाहूया. (Reasons Why Should You Eat Chapati With Ghee)2 / 8 तुपामुळे चपाती मऊ होते. ज्यामुळे ती चावायला सोपी जाते आणि लाळेसोबत मिसळून तिचे पचन व्यवस्थित होण्यास मदत होते. (Chapati With Ghee Benefits)3 / 8तूप हे नैसर्गिक ल्युब्रिकंट आहे. यामुळे पचनसंस्था चांगली राहते आणि अन्नचे पचन अधिक सुलभ होते. ज्यांना बद्धकोष्टतेचा त्रास आहे त्यांच्यासाठी तूप अतिशय गुणकारी आहे.4 / 8जेव्हा आपण नुसती चपाती खातो तेव्हा ती रक्तातील साखरेची पातळी लवकर वाढवू शकते. चपातीला तूप लावल्यामुळे तिचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी होतो ज्यामुळे रक्तातील साखरेची पातळी अचानक वाढत नाही.5 / 8 अन्नातील व्हिटामीन ए, डी, ई, के शोषून घेण्यासाठी फॅट्सची गरज असते. जी तुपातून पूर्ण होते.6 / 8तूप हे ऊर्जा देणारे उत्तम स्त्रोत आहे आणि ते मेंदूच्या कार्यासाठी तसंच स्मरणशक्तीसाठी फायदेशीर मानले जाते.7 / 8तूप त्वचेला तजेला देते आणि सांध्यांची वंगण राखण्यास मदत करते. ज्यामुळे हाडं मजबूत राहतात.8 / 8तूप चपातीची चव तर वाढवतेच पण त्यासोबतच शरीरातील उष्णता कमी करून शरीर निरोगी ठेवण्यासही मदत करते.