Join us

Pitru paksha 2025 : पितृपक्षात श्राद्ध भोजनात हवेच हे ७ पारंपरिक पदार्थ, घरोघरची परंपरा-सात्विक चव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2025 14:50 IST

1 / 9
पितृपक्षात काही पदार्थ केले जातात. जे वर्षानुवर्षे या पंधरा दिवसांच्या कालावधीत केले जात आहेत. हे पदार्थ करायला सोपे असतात तसेच पितृपक्षासाठी वाढल्या जाणाऱ्या पानात हे पदार्थ असतात.
2 / 9
जागेनुसार पद्धती बदलतात. विविध ठिकाणी विविध पदार्थ केले जातात. त्यापैकीच काही पदार्थ आहेत जे घरोघरी या कालावधीत केले जातात.
3 / 9
न भाजता केलेले डाळींचे वडे या दिवसांत केले जातात. तांदूळ, हरभरा, डाळींचे मिश्रण करुन हे वड्याचे पीठ तयार केले जाते. चवीला हे वडे छान लागतात मात्र शक्यतो या कालावधीत केले जातात.
4 / 9
विविध प्रकारच्या भाज्या केल्या जातात. कमी मसाला लावलेल्या साध्या परतलेल्या भाज्या केल्या जातात त्यापैकी एक म्हणजे गवार भोपळा. समप्रमाणात गवार आणि भोपळा घेऊन वाफवून किंवा परतून ही भाजी केली जाते.
5 / 9
या दिवसांत अळूची पातळ भाजी केली जाते. शेंगदाणे, चणाडाळ आदी पदार्थ घालून ही भाजी केली जाते. चवीला खरंच फार छान असते. इतरही दिवशी ही भाजी केली जाते.
6 / 9
अनेकांना न आवडणारी कारल्याची भाजी पितृपक्षात नक्कीच केली जाते. परतून केली जाते. त्यासाठी कारल्याच्या चकत्या करुन त्या भिजवून मग परतायच्या.
7 / 9
पितृपक्षात वाढल्या जाणाऱ्या पानावर अनेक प्रकारचे पदार्थ असतात. त्यात तोंडीलावण्याचे पदार्थही असतात. जसे की आमसुलाची चटणी. ही चटणी अगदी झटपट होते आणि या पंधरा दिवसांत केली जाते.
8 / 9
गोडाचा पदार्थ कोणत्याही प्रसंगी केला जातोच. तसेच या पितृपक्षातही गोडाचा एक पदार्थ घरोघरी केला जातो. तो म्हणजे तांदूळाची खीर. ही खीर वर्षानुवर्षे पितृपक्षात केली जात आहे.
9 / 9
कढी हा पदार्थ वरचेवर घरी केला जातोच. मात्र या पंधरवड्यात कढीलाही महत्व असते. पितृपक्षासाठी वाढल्या जाणाऱ्या पानावर कढीची वाटी ठेवली जाते.
टॅग्स : पितृपक्षअन्नपाककृतीकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.किचन टिप्स